दिलासादायक ! ESIC च्या दोन मोठ्या योजनांच्या अटीत शिथीलता, हजारो लोकांना होणार फायदा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ESIC | देशात कोविड महामारीच्या (Corona Pandemic) पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले होते. हजारो असेही लोक होते जे आपल्या घरात रोजगाराचे एकमेव आधार होते आणि कुटुंब सांभाळत होते. मात्र, कुटुंबातील प्रमुख कमावणार्‍या व्यक्तीचा मृत्यु होणे किंवा Lockdown इत्यादीमुळे नोकरी सूटल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत (Financial Aid) देण्यासाठी सरकारांशिवाय अनेक इतर विभागांनी सुद्धा नवनवीन योजना लागू केल्या होत्या. (ESIC)

 

याच दरम्यान एम्लॉय स्टेट इन्श्युरन्स कॉर्पोरेशनकडून (ESIC) कोविड-19 रिलीफ स्कीम (Covid-19 Relief Scheme) सुरू करण्यात आली होती. तर याच्या अगोदरपासून सुरू सुरू असलेल्या अटल विमित व्यक्ती कल्याण योजनेचा सुद्धा विस्तार करण्यात आला, जेणेकरून लोकांना याचा फायदा व्हावा.

 

कोविड-19 रिलीफ स्कीमच्या या अटी केल्या शिथिल
ईएसआयसीमध्ये इन्श्युरन्स कमिश्नर, रेव्हेन्यू अँड बेनिफिट एम. के. शर्मा यांनी सांगितले की, 3 जून 2021 पासून ही योजना लागू केली आहे. ईएसआयसी कोरोनाने मृत कर्मचार्‍याच्या सर्व अवलंबितांना दरमहिना मृताच्या वेतनाच्या 90 टक्के पैसे देत आहे. शनिवारी झालेल्या निर्णयानंतर यामध्ये आणखी दिलासा देण्यात आला आहे.

 

शर्मा यांनी सांगितले की, आता अटी सुलभ केल्या आहेत. जर कोविडने मृत्यू होण्याच्या तीन महिने अगोदर जरी एखाद्या कर्मचार्‍याचे ईएसआयसीमध्ये रजिस्ट्रेशन (ESIC Registration) झाले असेल आणि त्याने एका महिन्यात किमान 12 दिवस सुद्धा जरी काम केले असेल आणि त्याचे पैसे ईएसआईसीमध्ये जमा झाले असतील तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना त्याच्या वेतनाच्या 90 टक्के भाग दरमहिना जीवन लाभ म्हणून दिला जाईल.

अटल विमित व्यक्ती कल्याण योजनेत यांना मिळेल लाभ
अटल विमित व्यक्ती कल्याण योजना (atal bimit vyakti kalyan yojana) म्हणजे एबीव्हीकेवायच्या (ABVKY) अटी शिथिल केल्या आहेत. शर्मा यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत सॅलरीचा 50 टक्के भाग तीन महिन्यांपर्यंतच दिला जातो. तीन महिने तो काळ आहे ज्यामध्ये कुणीही बेरोजगार नवीन नोकरी शोधेल. याच दरम्यान जर त्याला नोकरी लागली आणि त्याचे ईएसआयसीमध्ये योगदान येऊ लागले तर ही रक्कम तीन महिने अगोदरच बंद होईल. मात्र, पुन्हा नोकरी गेल्यास तो पुन्हा लाभ घेऊ शकतो. हा लाभ वेगवेगळ्या तीनवेळा घेता येतो.

 

मात्र, आता या योजनेत एका मोठ्या बदलाला परवानगी देण्यत आली आहे.
या अंतर्गत आता एक वर्षाची नोंदणी आणि एका काँट्रीब्यूशन पीरियडवर सुद्धा अर्जदाराला योजनेचा लाभ देता येऊ शकतो.
आतापर्यंत दोन वर्षाची नोंदणी आणि ESIC मध्ये दोन काँट्रीब्यूशन पीरियडवरच अर्ज करता येत होता.

 

Advt.

आता योजनेच्या अटी जास्त सुलभ करण्यात आल्या आहेत.
ईएसआयसीमध्ये सहा महिन्यांचा एक काँट्रीब्यूशन पीरियड असतो ज्यामध्ये कमीत कमी 78 दिवसांचे योगदान असावे.
मात्र, आता एका काँट्रीब्यूशन पीरियडने लाभ मिळणार असल्याने या कक्षेत येणारे अनेक लोक अर्ज करू शकतील.

 

Web Title :- ESIC | esic two big atal bimit vyakti kalyan yojana and covid 19 relief schemes conditions going to be easy to benefit people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hair Care Tips | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून नष्ट करेल ‘ही’ गोष्ट; केस होतील काळे, दाट आणि मजबूत

Rupali Chakankar | …तर सरपंचपद धोक्यात येणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस

Multibagger Penny Stock | रू. 1.18 चा Stock झाला रू. 78 चा, एका वर्षात 1 लाख रुपये झाले 66 लाख, तुमच्याकडे आहेत का?