कामाची गोष्ट ! नोकरी गेल्यानंतर देखील 2 वर्ष मिळत राहणार पगार, तुम्ही देखील घेऊ शकता ‘या’ स्कीमचा फायदा, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना नेहमीच नोकरी जाण्याची भीती वाटत असते. मात्र आता त्या बाबत जास्त परेशान होण्याची गरज नाही कारण आता जरी तुमची नोकरी सुटली तरी तुम्हाला दोन वर्षांपर्यंत पगार मिळत राहणार आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (ESIC ) ने एक मोठे पाऊल उचलले आहे.

ESIC ने सांगितले की, अटल विमा व्यक्ती कल्याण योजना’ अंतर्गत तुमची नोकरी गेल्यास सरकार आर्थिक मदत पुरवते. रोजगाराच्या अनैच्छिक नुकसानीमुळे किंवा रोजगारी कमी होत चालल्यामुळे ईएसआयसी आपल्याला 24 महिन्यांच्या कालावधीसाठी महिन्याला रोख रक्कम देते.

कसा उचलू शकता फायदा
जर तुम्ही देखील या योजनेचा फायदा उचलू इच्छिता तर तुम्हाला ESIC च्या अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. ESIC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजने संदर्भातील फॉर्म डाउनलोड करू शकता आणि हा फॉर्म भरून तुम्हाला तो ESIC च्या जवळच्या ब्रांचमध्ये जमा करावा लागेल. यासोबत 20 रुपयांचा नॉन-ज्‍यूडिशियल पेपरवर ऍफिडेविट करावे यामध्ये AB-1 पासून ते AB-4 फॉर्म जमा केला जाईल. यासाठी ऑनलाइन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी www.esic.nic.in वेबसाइटवर जाऊ शकता. लक्षात ठेवा या सुविधेचा लाभ तुम्ही केवळ एकदाच घेऊ शकता.

यांना मिळणार नाही योजनेचा फायदा
या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही नियमावली बनवण्यात आली आहे. ESIC संबंधित कोणताही असा व्यक्ती ज्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे किंवा ज्याच्या नावावर एखादा गुन्हा दाखल झाला आहे असा व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त जे लोक स्वइच्छने रिटायरमेंट घेतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा –