कमी पगार असलेल्या नोकरदारांसाठी मोदी सरकारचं ‘गिफ्ट’, कोट्यावधी जणांना मिळणार ‘आरोग्य सुविधा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी राज्य विमा विभागाने (ESIC) आपल्या लाभार्थ्यांना वैद्यकिय सुविधा देण्यासाठी ‘आयुष्यमान भारत’बरोबर पार्टनरशिप केली आहे. ESIC आणि आयुष्यमान भारत दरम्यान विशेष पार्टनरशिपने 102 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना लाभ मिळले. तसेच रुग्णालय सुरु करण्यासाठीच्या नियमांत देखील काही दिलासा देण्यात येईल. या माध्यमातून ESIC जवळपास 13.56 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करेल.

रुग्णालय सुरु करण्यासाठी या नियमांत होणार बदल
श्रम आणि रोजगार खात्याचे मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितले की ESIC ने लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी नुकतेच आयुष्यमान भारतबरोबर पार्टनरशिप केली आहे. याला जोडलेल्या 102 जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना लाभ मिळेल. गंगवार म्हणाले की जिल्ह्यांत नवी रुग्णालये सुरु करण्यासाठीच्या काही नियमांत दिलासा मिळणार आहे. यानंतर आता 30 खाटा असलेले रुग्णालय सुरु करता येईल. जेथे 20,000 IPs उपल्बध असते. राजधानी दिल्लीच्या रोहिनीमध्ये एका कार्यक्रमात गंगवार म्हणाले की ESIC ने चितेंतून मुक्तता मोबाइल अ‍ॅप आणि भागीदारांसाठी हेल्प डेस्क उपलब्ध करुन दिला देण्यात येईल.

काय आहे ESIC
ही एक सामाजिक सुरक्षा संघटना आहे, जी गरजूंना विस्तृत सामाजिक सुरक्षेसारखी उत्तम सेवा सुविधा आणि रोख रक्कमेचा लाभ देते. ESIC कायदा त्या संस्थांमध्ये लागू होतो जेथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतात. या कायद्यांतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याला 21,000 रुपयांपर्यंत वेतन मिळते तर त्या कर्मचाऱ्याला आरोग्य सुविधा कवच आणि इतर लाभ मिळतात. सध्या देशात 12.11 लाख औद्योगिक संस्थामध्ये हा कायदा लागू आहे. ज्यात जवळपास 3.46 कोटी कुटूंबांना फायदा मिळतो.

Visit : Policenama.com