नोकरी करणार्‍या महिलांसाठी खुशखबर ! ESIC ने आजारपणातील लाभाशी संबंधीत नियमात केला बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) मंगळवारी झालेल्या बैठकीत नोकरी करणार्‍या महिलांना मोठा दिलासा दिला आहे. बैठकीत महिलांसाठी आजारपणातील लाभ (Sickness Benefit) घेण्याच्या अटींमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. ईएसआयसीच्या या बैठकीत मातृत्व रजेनंतर आवश्यकता भासल्यास आजाराशी संबंधीत सुटी देण्याच्या व्यवस्थेत दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, महिला विमाधारक 20 जानेवारी 2017 च्यानंतर याचा दावा करू शकतात. महिला विमाधारकाला यापूर्वी हा क्लेम मिळवण्यासाठी 78 दिवसापर्यंत काम करणे अनिवार्य होते. मात्र, आता तो कालावधी कमी करण्यात आला आहे.

अगोदर केले होते हे बदल –
यापूर्वी ईएसआयसीने मातृत्व लाभ 12 आठवड्यावरून वाढवून 26 आठवडे केला होता. अटींमध्ये ही सूट 20 जानेवारी 2017 पासून लागू होईल. त्याच दिवसापासून मातृत्व लाभ वाढवण्याचा निर्णय सुद्धा प्रभावी झाला होता.

हे आहेत नवीन नियम –
काही प्रकरणात महिला मातृत्व लाभ घेतल्यानंतर आजारापणाचा लाभ घेऊ शकत नव्हत्या. त्याचे कारण हे होते की, त्या यासाठी किमान 78 दिवसाच्या योगदानाची अट पूर्ण करू शकत नव्हत्या. आता या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

आणखी हॉस्पीटल केले जातील स्थापन –
यासोबतच ईएसआयसीने आपल्या विमा योजनेंतर्गत हरिद्वारमध्ये 300 बेडचे एक हॉस्पीटल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 50 सुपर स्पेशियलिटी असतील. याशिवाय विशाखापट्टणमच्या शीलानगरमध्ये एक 350 बेडचे हॉस्पीटल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वेगळे 50 बेडची एक सुपर स्पेशियलिटी विंग असेल. याशिवाय बैठकीत सर्व्हिसमध्ये सुधारणा कशी करता येईल, या मुद्द्यावर चर्चा झाली.

अडीच लाख लोकांना मिळेल फायदा –
हे हॉस्पीटल सुमारे अडीच लाख लोकांची आरोग्य गरज पूर्ण करण्यात उपयोगी ठरेल. कोरोना व्हायरस महामारीमुळे काम करण्याच्या अनिवार्य दिवसांची मर्यादा अन्य विमाधारकांसाठी सुद्धा 1 जानेवारी 2021 पासून 30 जून 2021 पर्यंत सवलतीच्या कक्षेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला.