ESIC : कामगारांना वैद्यकीय सेवांचा पुरवठा आणि अन्य फायद्यात सुधारणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईएसआयसीने कामगारांसाठी विविध मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC) ने आरोग्य विमा योजनेचा लाभ घेणाऱ्याना घराजवळच्या कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सेवा मिळाली आहे. या योजनेतील घराच्या दहा किमीच्या परिसरात जर ESIC हॉस्पिटल नसेल तर ESIC च्या संलग्न पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येतो. असे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी रविवारी झालेल्या बैठकीत ईएसआयसी कामगारांना सेवा आणि अन्य फायदे सुधारण्यासाठीच्या निर्णयांबद्दल माहिती दिली आहे.

जर राज्य शासनाने स्वतःच हॉस्पिटल चालविण्याचा आग्रह धरला नाही तर सर्व नवीन हॉस्पिटल आणि भविष्यातील हॉस्पिटल ईएसआयसीद्वारेच चालविली जातील. कामगारांच्या मागणीनुसार हे निर्णय घेण्यात आले आहे. लाभ घेणाऱ्यांना चांगले वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्या यासाठीचे मुख्य उद्दिष्ट आहे असते कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच जर एखाद्या लाभार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे असेल तर नियुक्त हॉस्पिटलने २४ तासांच्या आत लाभार्थ्यास कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ESICच्या अधिकृत अधिकाऱ्यामार्फत ऑनलाईन परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबत ईएसआयसी मुख्यालयाने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना ESIC च्या www.esic.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहे.

ईएसआयसीचा कामगारांना मोठा दिलासा –
कामगार राज्य विमा महामंडळाने (ESIC) आपल्या लाभार्थ्यांना आवश्यक प्रसंगीमध्ये घराजवळ असलेल्या कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमाधारक व्यक्ती आणि लाभार्थी जे ESIC योजनेच्या कक्षेत बसतात. त्यांना ESIC हॉस्पिटलमध्ये जाणे आवश्यक आहे आणि तेथून बाहेरील हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागणार आहे.