Essential Self Health Care Tips For Busy Moms | वर्किंग असो की हाऊस वाईफ, प्रत्येक आईने लक्षात ठेवल्या पाहिजेत आरोग्याशी संबंधित ‘या’ 6 गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Essential Self Health Care Tips For Busy Moms | आई वर्किंग असो वा हाऊस वाईफ, तिची मुले आणि कुटुंब हेच तिचे संपूर्ण जग असते. त्यांची काळजी घेत असतानाच ती काही वेळा तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायलाही मागेपुढे पाहत नाही (Essential Self Health Care Tips For Busy Moms). या मदर्स डे निमित्त आम्ही आरोग्याशी संबंधित अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत, ज्यांची काळजी घेणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे (Health Care Tips For Moms).

 

1. नाश्ता वगळू नका (Don’t Skip Breakfast) –
मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी काय करायचं याची तुम्हाला खूप काळजी असते, पण जेव्हा तुमच्या नाश्त्याचा प्रश्न येतो, तेव्हा घरच्या, ऑफिसच्या जबाबदार्‍या सांभाळताना तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. असे करू नका. आपल्या सकाळची सुरुवात रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीच्या कपाने करणे शहाणपणाचे नाही. सकाळचा नाश्ता दिवसभरातील ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतो (Essential Self Health Care Tips For Busy Moms).

 

2. चांगले खा (Eat Well) –
प्रक्रिया केलेले किंवा फास्ट फूड खाणे टाळा. याशिवाय आहारात जास्त साखरेचा समावेश करण्याची चूक करू नका. आपले लक्ष नेहमी निरोगी आहारावर ठेवा. यासाठी आहारात ताजी सेंद्रिय फळे, भाज्यांसह धान्याचा समावेश करा.

 

3. व्यायाम (Exercise) –
इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुमच्या वर्कआउट रुटीनकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा फिटनेसही घरातील बाकीच्या कामांइतकाच महत्त्वाचा आहे. तुमचे आरोग्य राखण्यात व्यायामाचीही मोठी भूमिका असते. तुमच्या घरची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे हे समजून घ्या. अशावेळी तुमची प्रकृती ठीक नसेल तर तुम्ही कुटुंबाची काळजी कशी घेणार.

4. हायड्रेटेड राहा (Stay Hydrated) –
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, थकवा (Headache, Fatigue) जाणवू शकतो. त्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल राखण्यासाठी पाणी प्या.

 

5. स्वतःसाठीही वेळ काढा (Take Time For Yourself) –
तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी स्वतःसाठीही थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. यासाठी आठवड्यातून किमान तीन तास स्वत:साठी वेळ काढा, मॉलमध्ये जा, शांत ठिकाणी बसा, आवडते पुस्तक वाचा किंवा पार्लरमध्ये फेशियल करा.

 

6. बी पॉझिटिव्ह (Be Positive) –
तुमच्या निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारात बदलण्याचा प्रयत्न करा.
जीवनाकडे पाहण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन तुम्हाला केवळ तणावमुक्त ठेवेल,
तसेच तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- essential self health care tips for busy moms

 

 Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Back Pain | कंबरदुखीपासून लवकर मिळेल आराम ! केवळ अवलंबा डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ 6 घरगुती पद्धती; जाणून घ्या

 

How To Live A Long Life | दीर्घायुष्य पाहिजे तर सेवन करा ‘या’ गोष्टी, शास्त्रज्ञांनी सांगितला निरोगी जीवनाचा फार्म्युला; जाणून घ्या

 

High Cholesterol-Diabetes | हाय कोलेस्ट्रॉलपासून डायबिटीजपर्यंत, डोळे सांगतात 6 आजारांचे रहस्य; जाणून घ्या