Essential Tests For Women | 30 वर्षानंतर महिलांनी अवश्य केल्या पाहिजेत ‘या’ 5 टेस्ट; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Essential Tests For Women | वय वाढण्यासह शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. वाढत्या वयाचा सर्वात जास्त परिणाम मेटाबॉलिज्मवर होतो आणि ते कमजोर झाल्याने डायबिटीज आणि हायपरटेन्शन सारखे आजार होऊ लागतात. महिलांसाठी 30 वर्षाचे वय खुप महत्वाचे आहे. (Essential Tests For Women)

या वयात अनेक जबाबदार्‍या आणि मानसिक दबावात संतुलन राखणे अवघड होते, ज्याचा परिणाम आरोग्यावर पडतो. 30 व्या वयात अनेक हार्मोनल बदलसुद्धा होतात. याच कारणामुळे हेल्थ एक्सपर्ट या वयात महिलांना 5 टेस्ट करण्याचा सल्ला आवश्यक देतात. या टेस्ट कोणत्या ते जाणून घेवूयात.

1. कम्प्लीट ब्लड काऊंट (Complete blood count) –
कम्प्लीट ब्लड काऊंटला CBC सुद्धा म्हणतात. सीबीसीमधून इन्फेक्शन, अ‍ॅनीमिया, डिसऑर्डर आणि काही प्रकारचे कॅन्सर समजू शकतात. तसेच लाल रक्तपेशी (R.B.C s), पांढर्‍या रक्तपेशी (W.B.C s), हिमोग्लोबिन, हेमटोक्रिट (Hct) आणि प्लेटलेट्सबाबत माहिती मिळते.

2. लिपिड प्रोफाईल (Lipid profile) –
लिपिड प्रोफाइलमध्ये रक्तातील वसा अणुंची मात्रा मोजली जाते. यामध्ये अनेकप्रकारच्या कोलेस्ट्रॉलबाबत समजते. ही टेस्ट हृदयाचे आजार आणि रक्त वाहिन्यांच्या आरोग्याची चाचणी करण्यास मदत करते.

लिपिड प्रोफाइल समजल्यानंतर खाण्याच्या सवयी, डाएट, तणाव, एक्सरसाइज आणि लाइफस्टाइल योग्य करता येते. सामान्यपणे थायरॉईड किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज खराब लिपिड प्रोफाइलशी संबंधीत आहे. (Essential Tests For Women)

3. थायरॉईड फंक्शन टेस्ट (Thyroid function test) –
भारतात जवळपास 10 पैकी 1 महिलेला थायरॉईडची समस्या आहे. याची लक्षणे सुरुवातीला कमी दिसतात. यासाठी 30 वर्षानंतर महिलांनी थायरॉईडची चाचणी केली पाहिजे. याच्या सामान्य लक्षणात अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, केस गळणे किंवा इनफर्टिलिटी आहे.

4. ब्लड शुगर (Blood sugar) –
35-49 वयात अनेक महिलांना डायबिटीजची समस्या होते. लवकर निदान होत नाही. डायबिटीजमध्ये ब्लड शुगर अचानक वाढते, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. डायबिटीजमध्ये शरीरात इन्सुलिन व्यवस्थित तयार होऊ शकत नाही. एनर्जी आणि ब्लड शुगरचा वापर करण्यासाठी इन्सुलिन खुप आवश्यक आहे.

5. पॅप स्मीयर टेस्ट (Pap smear)-
महिलांमध्ये सर्व्हाईकल कॅन्सरची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.
पॅप स्मीयर स्क्रीनिंगद्वारे सर्व्हाईकल कॅन्सरचा शोध सुरूवातीच्या स्टेजमध्ये लागू शकतो.
या टेस्टद्वारे सर्व्हाईकलमध्ये होत असलेल्या बदलांचा शोधसुद्धा लावला जाऊ शकतो.

पेशींमध्ये होणारे बदलच पुढे कॅन्सरचे रूप धारण करतात.
हेल्थ एक्सपर्टनुसार, 30 किंवा यापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी प्रत्येक 5 वर्षात एकदा पॅप स्मीयर टेस्ट अवश्य केली पाहिजे.

Web Title :- Essential Tests For Women | essential diagnostic tests for women

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Recruitment Exam | पुणे पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेकडे उमेदवारांची पाठ ! जेमतेम 31.28 टक्केच उमेदवारांची हजेरी; 3 ‘डमी’ उमेदवार जाळ्यात

Pune NCP | पुण्यात पोलिस भरतीच्या परिक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना राष्ट्रवादीने दिला ‘निवारा’

Pune News | निळूभाऊ फुले, शंकरराव खरात यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा