पुण्यातील मानाच्या पहिल्या ‘कसबा’ गणपतीच्या स्थापनेचा ‘इतिहास’ आणि ‘मानक’ कथा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कसबा गणपती हे पुणे शहराचे ग्रामदैवत आहे. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान देण्यात येते. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळचा तांदळा एवढा या मुर्तीचा आकार होता, परंतू नंतर त्यावर शेंदूर चढवून याची उंची आता सुमारे साडेतीन फूटापर्यंत झाली आहे अशी कथा सांगण्यात येते. जेव्हा 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच वर्षी म्हणजेच 1893 साली कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली.

जिजाऊंकडून गणपतीची स्थापना –

जिजाबाईंना स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिल्याने जिजाबाईंनी या गणपतीची स्थापना केली होती असे म्हणले जाते. शहाजीराजे भोसले पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाताना या मुर्तीचे दर्शन घेऊन जात असत असे देखील सांगण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते.

मिथक कथा –

या गणपतीच्या स्थापनेबाबत एक कथा सांगण्यात येते की 16 व्या – 17 व्या शतकात विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील आठ कुटुंब मुस्लीम राज्यकर्त्यांच्या जाचाला कंटाळून मुळा नदीच्या, म्हणजेच तेंव्हाच्या पुणे या गावात येऊन स्थायिक झाले. त्यातील ठकार कुटूंबातील एका भक्ताने चतुःश्रुंगी जवळच्या गणेशखिंड येथे असलेल्या श्री गणपती देवळात अनुष्ठान केले. त्या देवळामधील गणपतीने त्यांना दृष्टांत दिला की मी कसबा पेठेतील ओढ्याच्या काठी असलेल्या वृक्षाखाली आहे. अशी कथा सांगण्यात येते.