दौंडमध्ये पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील दहिटने येथे गरूडकर कुटुंबीयांनी यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन करत नारळाच्या झाडाला गणेशाचे रूप देऊन पर्यावरण पूरक गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

गणेशोत्सवात गणरायाची मनोभावे भक्ती करण्यात येते मात्र विसर्जनानंतर याच गणेश मूर्तींचा अवमान होतो त्यामुळे गणेश मुर्ती अवमान टाळण्यासाठी आणि जलप्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण हे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले असल्याचे राहुल गरूडकर यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणारे राहुल गरूडकर आणि त्यांच्या पत्नी संपदा गरूडकर हे दाम्पत्य टेक्नॉलॉजिच्या क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी “We can live without technology but we can’t live without ecology” हा अनमोल संदेश या कार्यातून दिला आहे. भविष्यात येणारा प्रत्येक गणेशोत्सव वृक्षारोपण करून साजरा करणार असून येत्या पाच दिवसांत गणरायाची आरती करून रोज एक झाड लावणार असल्याचा निर्धार राहुल यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांनीही केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त