साखर संकटावर मात करण्यासाठी इथेनॉल बेस्ट पर्याय

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन

प्रतिनिधी : शिल्पा माजगावकर

सध्या भारतात 200 लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त उत्पादित होत असल्याने भारता समोर भलं मोठं साखर संकट निर्माण होणार आहे. या संकटावर मात करण्यासाठी साखरे पासून इथेनॉल निर्माण करण्याचा पर्याय वापरला नाही तर देशातील साखर उद्योग प्रचंड अडचणीत येणार आहे.

साखर उत्पादनात भारताने ब्राझीला जरी माग टाकलं असलं तरी आपल्या देशावर अतिरिक्त साखरेचं भलं मोठं संकट उभं राहिलेलं आहे.

भारतावर साखर संकट…

सण 2017-18 सालात 100 लाख मेट्रिक टन लाख साखर शिल्लक

सण 2018-19 सालात 350 लाख मॅट्रिक टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज

म्हणजेच येणाऱ्या वर्षात देशात 450 लाख मॅट्रिक टन साखर उत्पादित होणार

आपल्या देशाची साखरेची गरज 250 लाख मॅट्रिक टन आहे

त्यामुळं आपल्या देशात 200 लाख मॅट्रिक टन साखर शिल्लक राहणार आहे

 

कृषि प्रधान देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. भारतात सर्वाधिक पीक उसाच घेतल जातं. राज्यात उसापासून साखर निर्मिती करणारे सहकारी तत्वांवरील 101 आणि खाजगी 86 असे 187 साखर कारखाने राज्यात आहेत. तर देशात 516 साखर कारखाने कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात भारतात साखरेचं विक्रमी उत्पादन होत आहे. त्यामुळं भारत हा साखर निर्यात करणारा देश म्हणून जगात ओळखला जातो. गेल्या वर्षी साखरेचं विक्रमी उत्पादन देशात झालं होतं. यावर्षी 350 लाख मेट्रिक टन साखर उत्पादीत होणार आहे. त्यातच गेल्या वर्षी देखील जवळपास 100 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. तर भारताची साखरेची गरज 250 लाख मॅट्रिक टन आहे . त्यामुळं देशा समोर 200 लाख मॅट्रिक टन अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून अतिरिक्त साखरे मार्फत इथेनॉलच उत्पादन करून ब्राझील प्रमाणे वाटचाल करण गरजेचं असल्याचं साखर तज्ज्ञांचं मत आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालकासह ‘त्यांना’ बडतर्फ करा

अतिरिक्त साखरेचं नियोजन करण्यात केंद्र सरकार कमी पडत आहे. दिल्लीतील कृषी भवनात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना देशातील ऊस शेतीबद्दल पूर्ण माहिती नाही. त्यामुळं स्वतःची आद्ययवत यंत्रणा न वापरता खाजगी संस्थेकडून मिळलेल्या माहितीवर साखरेचं नियोजन चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. देशातील अतिरिक्त साखरेचं योग्य नियोजन झालं आणि इथेनॉल सारखा पर्याय आला तर परकीय चलन वाचवण्या बरोबर अनेक चांगल्या गोष्टी देशात घडू शकतात अस राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने सध्या इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिलं असलं तरी खाजगी पेट्रोलियम कंपन्या कडून योग्य प्रतिसाद दिसत नाही. जर इथोनॉल सारखा पर्याय उभा राहिला तर ऐरनिवर असणारा प्रदूषणाचा मुद्दा निकालात निघेल, आयात होणाऱ्या इंधनाचा खर्च वाचेल यांसह अनेक हिताचे पर्याय उभे राहणार आहेत.

उत्कृष्ट नियोजनामूळ जगात ब्राझील हा साखर उत्पादनात अग्रेसर राहिला आहे. जेवढी लागेल तेवढी साखर उत्पादन करून उर्वरित साखर ही इथोनॉल निर्मिती वळवली आहे. ब्राझील चा आदर्श घेऊन भारताने सुद्धा आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या साखरेचं नियोजन केले तर शिल्लक राहणाऱ्या अतिरिक्त साखरेचा प्रश्न नक्कीच सुटेल.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9ae8ef69-b04c-11e8-951f-11f971b7d4e3′]