मुंबईत सुरु होणार स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीची चाचणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोव्हॅक्सिन या स्वदेशीची लसीची क्लिनिकल ट्रायलला अखेर आज गुरुवारी (दि. 26) एथिक समितीने मान्यता (ethic-committee-grants-permission-testing-made-india-covaccine-will-be-tested-mumbai-large) दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात या आठवड्यापासून ट्रायल सुरु केली जाणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एथिकल समितीच्या मान्यतेसाठी भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन या स्वदेशीची लसीची क्लिनिकल ट्रायल सायन रुग्णालयात रखडली होती. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाच्या नैतिक समितीला ट्रायलच्या मुंजरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र समितीकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याने या लसीची चाचणी सुरु करण्यास उशीर झाला होता. मात्र आता लसीचा मार्ग मोकळा झाला असून ही लवकरच ही लस स्वयंसेवकांना दिली जाणार आहे.

याबाबत सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले की, आज झालेल्या बैठकीत एथिक समितीकडून चाचणी घेण्यास परवानगी मिळाली आहे. स्वयंसेवकांच्या लसीकरणासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. एक दोन दिवसात आम्हाला लस मिळाल्यानंतर चाचणी सुरु केली जाईल. तर जेजे रुग्णालायाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर म्हणाले की, लसीच्या चाचणीच्या तिस-या टप्प्यात आयसीएमआरने जेजे ची निवड केली आहे. आम्हाला रुग्णालयाच्या नैतिक समितीकडून देखील परवानगी मिळाली आहे. आम्ही आठवडाभरात चाचणी सुरु करणार आहोत.

कोरोनाला हरवण्यासाठी मुंबईत अनेक लसीच्या चाचण्या सुरु आहेत. एककीकडे ऑक्सफर्डच्या परदेशी लसीच्या चाचण्या केईएम, नायर आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरु आहेत. तर दुसरीकडे भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद, (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ व्हायरोलॉजी (एनआव्ही) च्या मदतीने विकसित झालेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिन चाचणीसाठी भारत बायोटेकने महापालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयाची निवड केली आहे. दोन्ही रुग्णालयात तिस-या टप्प्यातील लसीची चाचणी घेतली जाणार आहे.