जगापेक्षा 7 वर्ष मागे ‘हा’ देश, अजूनही चालू आहे 2012

अदिस अबाबा : वृत्तसंस्था – सध्या जगभरात 2019 साल सुरू आहे, परंतु जगातील असा एक देश आहे जो जगापासून 7 वर्षे मागे आहे. अजूनही या देशात अजूनही 2012 साल चालू आहे. एवढेच नव्हे तर या देशात एक वर्ष 13 महिने असते. इथिओपिया असे या देशाचे नाव आहे.

इथिओपिया या देशाची लोकसंख्या अवघ्या 10 कोटी आहे. विशेष गोष्ट अशी आहे की जगातील सर्व देश 1 जानेवारी रोजी आपले नवीन वर्ष साजरे करतात, त्याचबरोबर जगातील सर्व देश एकाच ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार चालतात आणि त्यांचे सणही या कॅलेंडरनुसार असतात. तर इथिओपियामधील रहिवासी 11 सप्टेंबर रोजी त्यांचे नवीन वर्ष साजरे करतात. इथिओपियाच्या लोकांचे स्वतःचे कॉप्टिक कॅलेंडर आहे ज्यानुसार ते चालतात.

इथिओपियाच्या रहिवाशांचा असा विश्वास आहे की येशूचा जन्म ईसवीसनपूर्व 7 मध्ये झाला होता आणि त्यानुसार येथे दिवसांची मोजणी सुरू झाली, त्यानंतर कॉप्टिक दिनदर्शिका तयार झाली. ज्या दिवशी संपूर्ण जग हा उत्सव साजरा करीत असते त्या दिवशी इथिओपियात कोणताही उत्सव साजरा केला जात नाही.

Visit : Policenama.com