विमान हवेत असतानाच स्त्रीची प्रसूती आणि…

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – एका स्त्रीने विमानातच आपल्या बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. तसं काही अशी बातमी आपल्यासाठी नवीन नक्कीच नसेल. कारण एखाद्या स्त्रीची प्रवासादरम्यान प्रसूती झाल्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. इतकेच नाही तर ही प्रसूती कधी रिक्षात तर कधी ट्रेनमध्ये झाल्याने तारांबळ उडाल्याचेही आपल्या कानावर आले असेल. ही घटनाही तशीच काहीशी आहे. शिवाय विमानाचे विमानाचे इमर्जन्सी लँडींगही करावे लागल्याचे समोर आले आहे.

हवेत उडणाऱ्या विमानात महिलेने बाळाला जन्म दिल्याने विमानातील कर्मचारी आणि इतर प्रवासी यांची चांगलीच पळापळ झाली. हे विमान अबूधाबीहून जकार्ता याठिकाणी निघाले होते. आता विशेष म्हणजे महिला आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका उद्भवू नये यासाठी विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलेची प्रसूती झाल्याने या विमानाचे अचानक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करावे लागले. विमान लँड झाल्यानंतर प्रसूत झालेली महिला आणि नवजात अर्भकाला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे विमान इतिहाद एअरवेज या कंपनीचे होते. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.

सदोष पाणी कपातीचे वेळापत्रक पाहून पुणेकर टेन्शनमध्ये

नेमके काय घडले ?
विमानात अचानक गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. विमानातील कर्मचारी आणि अन्य महिला प्रवासी यांच्या मदतीने तिची प्रसूती करण्यात आली. यादरम्यान पायलटला याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यामुळे त्यांनी त्वरीत ट्रॅफीक कंट्रोल रुमशी संपर्क करुन संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती दिली. त्यानंतर वेळ न घालवता जवळच्या विमानतळावर लँडींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हे विमान भारताच्या हद्दीत असल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे लँडींग करण्यात आले. मात्र विमानातील कर्मचारी, पायलट यांनी घेतलेल्या इमर्जन्सी लँडींगच्या निर्णयामुळे ही महिला आणि तिचे बाळ सुखरुप असल्याचे म्हटले जात आहे. महिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर विमान पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्याचेही सांगण्यात आले.