युरो कप 2020 स्पर्धेतील बाद फेरीतील सामने 26 जूनपासून; या 16 संघात लढत रंगणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – euro cup 2020 | युरो कप २०२० स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने नुकतेच संपले आहे. आता २६ जूनपासून बाद फेरीतील सामने होणार असून या सामन्यांसाठी १६ संघ सज्ज झाले आहेत. या लढतीनंतर उपांत्यपूर्व फेरीत यातील संघ पोहोचणार आहेत. बाद फेरीत साखळी फेरीत एकही सामना न हारणाऱ्या इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्व प्रथम धडक मारली आहे. त्यापाठोपाठ वेल्स, डेन्मार्क, चेक रिपब्लिकन, क्रोएशिया, स्पेन, इंग्लंड आणि स्वीडन या संघांनी बाद फेरीत आपले स्थान निश्चित केल आहे. दरम्यान साखळी फेरीतील फ या खडतर गटातून बाद फेरीत कोणता संघ येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले. euro cup 2020 these 16 team qualified for round 16 next level

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

साखळी सामन्यात पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटले. विजयी गोल करण्यासाठी चारही संघ धडपडत होते. पण कोणालाही यश मिळाले नाही अखेर हे सामने बरोबरीत सुटले. बाद फेरीत या गटातील फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगाल संघाची वर्णी लागली.

साखळी फेरीत अ गटातील स्विझरलँडने वेल्ससोबतचा सामना बरोबरीने म्हणजे १-१ने सोडवला. मात्र इटलीकडून ३-०ने पराभव स्वीकारावा लागला. टर्कीविरुद्धच्या सामन्यात स्विझरलँडने कमबॅक करत टर्कीचा ३-१ ने पराभव करत बाद फेरीतील स्थान निश्चित केलं. युक्रेन साखळी फेरीत नेदरलँडने ३-२ ने, तर ऑस्ट्रियाने १-० ने पराभूत केलं होतं. तर नॉर्थ मसेडोनिया संघाला युक्रेननं २-१ ने पराभूत केलं होतं

बाद फेरीतील सामने
वेल्स विरुद्ध डेन्मार्क (२६ जून, रात्री ९.३० वा)
इटली विरुद्ध ऑस्ट्रिया (२७ जून, मध्यरात्री १२.३० वा)
नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक (२७ जून, रात्री ९.३० वा)
बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल (२८ जून, मध्यरात्री १२.३० वा)
क्रोएशिया विरुद्ध स्पेन (२८ जून, रात्री ९.३० वा)
फ्रान्स विरुद्ध स्विझरलँड (२९ जून, मध्यरात्री १२.३० वा)
इंग्लंड विरुद्ध जर्मनी (२९ जून, रात्री ९.३० वा)
स्वीडन विरुद्ध युक्रेन (३० जून, मध्यरात्री १२.३० वा)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : euro cup 2020 these 16 team qualified for round 16 next level

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल