Europe Corona | युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक ! जर्मनीत आतापर्यंतचे सर्वाधिक 73 हजारांहून नवीन कोराना बाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  भारतासह आशिया खंडात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असताना युरोपात पुन्हा कोरोनाचा (Europe Corona) नव्या उद्रेक पहायला मिळत आहे. जर्मनीमध्ये २४ नोव्हेबरला एकाच दिवसात आजवरचे सर्वाधिक ७३ हजार ९६६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेतील कोरोना संसर्ग कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाही. अमेरिकेत अजूनही दररोज १ लाखांहून अधिक (Europe Corona) नविन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. अमेरिकेत २४ नोव्हेबर रोजी १ लाख ४ हजार ८१९ नवीन रुग्ण आढळून आले. सध्या अमेरिकेत ९३ लाख ८६ हजार ६११ सक्रीय रुग्ण आहेत.

 

युरोपामध्ये थंडीच्या या हंगामात कोरोनाचा चौथ्या लाटेने पुन्हा उचल खाल्याची चिन्हे दिसून येऊ लागली आहेत. जगभरात २४ नोव्हेबर रोजी ६ लाख ३० हजार ८६१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यातील निम्म्याहून अधिक नविन रुग्ण हे अमेरिका आणि युरोपातील (Europe Corona) आहेत.

 

जर्मनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची चौथी लाट आली आहे.
जर्मनीत पहिल्या लाटेत गेल्या वर्षी ६ एप्रिल २० रोजी सर्वाधिक ६ हजार ८१३ रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते.
त्यानंतर जर्मनीने कोरोनावर पूर्णपणे मात केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर नोव्हेंबर -डिसेबर २०२० मध्ये जर्मनीत दुसरी लाट आली होती.
त्यात एकाच दिवशी सर्वाधिक नवीन रुग्ण २३ डिसेबर २२ रोजी ३१ हजार २९७ रुग्ण आढळून आले होते.
त्यानंतर तिसरी लाट एप्रिल २०२१ दरम्यान आढळून आली होती.
त्यात १४ एप्रिल २१ रोजी एकाच दिवशी ३२ हजार ५४६ नवीन कोरोना बाधित आढळून आले होते. त्यानंतर ही लाट ओसरली. लसीकरणही मोठ्या प्रमाणावर झाले.
कोरोनावर मात केली असे वाटत असतानाच जर्मनी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. येथे ऑक्टोबरमध्ये चौथी लाट आली आहे.

२८ ऑक्टोबरला एकाच दिवशी नवे २६ हजार २६० रुग्ण आढळून आले. त्यानंतर ही संख्या प्रत्येक दिवशी वाढतच आहे.
१८ नोव्हेबर रोजी नवीन रुग्णांची संख्या ६४ हजार १६४ वर पोहचली आणि त्यानंतर आता २४ नोव्हेबर रोजी एकाच दिवशी जर्मनीत ७७ हजार ९६६ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.
सध्या जर्मनीत आतापर्यंतचे सर्वाधिक ७ लाख ३३ हजार ५३४ सक्रीय रुग्ण आहेत.
जर्मनीप्रमाणेच युरोपातील इतर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

 

Web Title : Europe Corona | Corona erupts again in Europe! In Germany, more than 73,000 new Korans have been infected so far

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Digital Bank | देशात स्थापन करणार डिजिटल बँक, नसेल कोणतीही ब्रँच, नीती आयोगाने ठेवला प्रस्ताव

Pune Crime | जुन्नर तालुक्यातील अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास पूर्ण, IG मनोज लोहिया यांची माहिती

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून इयत्ता 1 ली पासूनचे सर्व वर्ग सुरू होणार