65 वर्षीय हरिष साळवेंनी केलं दुसरं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्यांची नवी पत्नी

लंडन : वृत्तसंस्था – भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टचे वरिष्ठ वकील हरिष साळवे यांनी दुसरा विवाह केला आहे. ते 28 ऑक्टोबरला दुसर्‍या विवाह बंधनात अडकले. त्यांनी लंडनच्या एका चर्चमध्ये आपली मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्डशी विवाह केला. हे दोघांचेही दुसरे लग्न आहे. ब्रिटेनमध्ये क्विन्स कौन्सिल हरिष साळवे (65) यांनी मागच्या महिन्यात आपली पहिली पत्नी मिनाक्षी साळवे यांना घटस्फोट दिला होता, ज्यानंतर कायदेशीरदृष्ट्या ते त्यांच्यापासून विभक्त झाले.

साळवे यांनी आता कॅरोलिन यांच्याशी दुसरा विवाह केला आहे. दोघांना पहिल्या विवाहातून मुले आहेत. 56 वर्षांच्या कॅरोलिन व्यवसायाने कलाकार आहेत आणि त्यांची एक मुलगी सुद्धा आहे. साळवे आणि कॅरोलिन एका आर्ट एग्झिबिशनमध्ये भेटले होते, नंतर दोघांमध्ये हळुहळु मैत्री झाली आणि आता ही मैत्री विवाह बंधनात अडकली आहे. साळवे यांनी धर्म परिवर्तन केले आहे, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. यामुळे त्यांनी आपला विवाह चर्चमध्ये केला.

महाराष्ट्रातील नागपूरमध्ये वाढलेले साळवे यांचे वडील एनकेपी साळवे चार्टर्ड अकाऊंटंट होते आणि काँग्रेसचे सदस्यसुद्धा होते. चीफ जस्टिस अरविंद बोबडे आणि हरिष साळवे स्कूलमेट होते, दोघांनी नागपूर शहरात शिक्षण घेतले आहे. आज हरिष साळवे देशातीलच नव्हे, तर जगातील प्रसिद्ध वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी देशातील अनेक प्रसिद्ध लोकांसाठी केस लढली आहे.

साळवे 1976 मध्ये दिल्लीत आले. येथे त्यांनी वकिली केली. त्यांनी मुकेश अंबानी, रतन टाट, आयटीसी हॉटेल, वोडाफोन आणि हिट अँड रन केसमध्ये बॉलिवुड अ‍ॅक्टर सलमान खानची सुद्धा केस लढली होती. ते सॉलिसिटर जनरल सुद्धा होते. त्यांनी 2003 मध्ये अंतरराष्ट्रीय प्रकरणांतही बाजू मांडणे सुरू केले होते. यानंतर ते लंडनमध्ये कायमस्वरूपी राहू लागले. येथे 2013 मध्ये ते इंग्लिश बार नियुक्त झाले आणि आता याचवर्षी जानेवारीत ते क्विन्स कौन्सिल नियुक्त झाले. त्यांनी मागच्या वर्षी क्सिन्स कौन्सिलसाठी अर्ज केला होता आणि जानेवारीत त्यांची नियुक्ती करण्यात आली.