‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी स्पेनने पुन्हा दिले राष्ट्रव्यापी कर्फ्यूचे आदेश

बार्सिलोना : युरोपमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा पसरल्याने स्पेनच्या सरकारने रविवारी राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली, ज्यामध्ये रात्रीत कर्फ्यू लावण्याचा सुद्धा समावेश आहे. सरकारला आशा आहे की, यामुळे तशी स्थिती निर्माण होणार नाही, जेव्हा देशात हॉस्पीटलमध्ये व्यवस्था जवळपास उध्वस्त झाली होती. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी म्हटले की, स्पेनच्या रस्त्यांवर 11 वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांच्या वर्दळीला लावलेल्या प्रतिबंधातून कामावर जाणारे, औषधे खरेदी करण्यासाठी निघालेले, ज्येष्ठ आणि लहानांच्या देखभालीसाठी घरातून निघणार्‍यांना सूट असेल.

त्यांनी म्हटले की, कर्फ्यू रविवारी रात्रीपासून प्रभावी आहे आणि तो सहा महिन्यांसाठी प्रभावी राहाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्राला संबोधित करताना सांचेझ यांनी म्हटले, सत्य हे आहे की, युरोप आणि स्पेन महामारीच्या दुसर्‍या लाटेत बुडाले आहे. आपण खुप अवघड स्थितीत जगत आहोत.

पंतप्रधानांनी म्हटले की, स्पेनची 17 क्षेत्र आणि दोन स्वायत्त शहरांच्या प्रमुखांना कर्फ्यूचे आणखी कठोर तास लागू करणे, प्रवासासाठी क्षेत्रीय सीमा बंद करणे हे अधिकार असतील. हा कर्फ्यू स्पेनच्या कॅनेरी द्वीपसमूहावर लागू असणार नाही.

मुख्य भूमीवर कर्फ्यूसोबतच स्पेनचा शेजारी फ्रान्सच्या उदाहरणाचे अनुकरण करत आहे, जेथे सरकारने प्रमुख शहरांसह मोठ्या भागात रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा केली आहे. आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, रात्री निघणारे लोक आणि पार्टीचे शौकीन असणारे, संसर्गाच्या नव्या लाटेसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. सांचेझ यांनी म्हटले की, संसदेच्या खालच्या सभागृहातून या आठवड्यात ते सांगतील की, आपत्ती कालावधी मेपर्यंत वाढवावा.