भारतात हल्‍ले करणारे दहशतवादी चंद्रावरून येत नाहीत, युरोपीयन युनियननं पाकिस्तानला ‘झापलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरच्या मुद्यावर जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. तरीही पाकिस्तान अद्याप काश्मीरचा मुद्दा सोडण्यास तयार नाही. यावेळी युरोपियन युनियनच्या संसदेने काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानला धारेवर धरले आहे.

भारताचे समर्थन केले पाहिजे – युरोपियन कन्झर्व्हेटिव्ह अ‍ॅण्ड रिफॉर्मिस्ट ग्रुप
पोलंडच्या युरोपियन कन्झर्व्हेटिव्हज आणि रिफॉर्मिस्ट्स ग्रुपचे रिस्‍जार्द कजार्नेकी म्हणाले की, ‘महान लोकशाही असणारा भारत हा एक देश आहे. आम्हाला भारतात आणि विशेषत: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष द्यावे लागेल. भारतात हल्ले करणारे दहशतवादी चंद्रावरुन खाली येत नाहीत. ते फक्त शेजारच्या देशांमधून येतात. आपण भारताचे समर्थन केले पाहिजे.’

इटलीच्या युरोपियन पीपल्स पार्टी (ख्रिश्चन डेमोक्रॅट्स) चे नेते फाल्वियो मार्शिलो यांनी युरोपियन युनियनच्या संसदेला सांगितले की, ‘पाकिस्तानने अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तान असा एक देश आहे जेथे बसलेले दहशतवादी कोणत्याही भीतीशिवाय युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचू शकतात. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये मानवाधिकारांचे उघडपणे उल्लंघन होत आहे आणि याचा उल्लेखही केला जात नाही.’

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाचे सहकार्य नाहीच –
जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांव्यतिरिक्त इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने उपस्थित केला आहे, पण कोणीही त्याचे समर्थन करत नाही. त्याचा जवळचा मित्र चीनसुद्धा या प्रकरणात उघडपणे बोलत नाही. त्याचवेळी अमेरिकेतील माजी पाकिस्तानी मुत्सद्दी हुसेन हक्कानी यांनी अलीकडेच पाकिस्तानच्या ढासळत्या प्रतिमेसाठी इम्रान सरकार आणि पाकिस्तान सैन्य जबाबदार असल्याचा आरोप केला.

Visit – policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like