home page top 1

लग्नाच्या 46 वर्षांनंतरही अमिताभ-जया यांच्यामध्ये ‘या’ कारणामुळे ‘युद्ध’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी बॉलीवूडमधील एक आदर्श जोडपे म्हणून पहिले जाते. त्यांना अनेकजण ‘परफेक्ट कपल’ म्हणून ओळखतात. या दोघांची केमिस्ट्री अत्यंत छान असून अमिताभ आणि जया एकत्रपणे खूप सुंदर दिसतात. पण लग्नानंतर ४६ वर्षानंतरही एका गोष्टीवरुन अमिताभ आणि जया यांच्यात ‘युद्ध’ सुरू असते. कौन बनेगा करोडपतीच्या सीझन ११ मध्ये स्वत: अमिताभ यांनी याचा खुलासा केला.
शादी के 46 साल: अमिताभ-जया के बीच इस बात को लेकर हो जाता है 'युद्ध'
सोमवारी इंदूरचा आसीम चौधरी शोमध्ये हॉटसीटवर बसले होते. शोमधून असीमने १२.५ लाख जिंकले. शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना एक सल्लाही दिला आहे. अमिताभने आसीमला विचारले-तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली ? या प्रश्नाच्या उत्तरात आसीमने अंदाजे सांगितले की त्याच्या लग्नाला पाच ते साडेपाच वर्षे झाली आहेत. अमिताभ म्हणतात की किती वर्षे उलटली हे तुम्हाला ठाऊक नाही ? ही खूप महत्वाची तारीख आहे. आपण सर्वकाही विसरा, परंतु ही तारीख विसरू नका मात्र आपण विसरलात. मी माझ्या स्पर्धकांना वारंवार सांगत राहतो की ती तारीख लक्षात ठेवा.
शादी के 46 साल: अमिताभ-जया के बीच इस बात को लेकर हो जाता है 'युद्ध'
इतक्यात असिम विचारतो की सर जया मॅडम तुम्हालाही आठवण करून देतात का ? तुमच्यातही यावरून काही होते का ? यावर, अमिताभ म्हणतात हो मग ? अगदी युद्ध झाले आमचे यावर अनेकदा. आपल्याला आठवत नाही की आपण लग्न केले होते ? अशाप्रकारे त्या खरडपट्टी काढतात. म्हणून ही तारीख लक्षात ठेवा.
शादी के 46 साल: अमिताभ-जया के बीच इस बात को लेकर हो जाता है 'युद्ध'
यानंतर, अमिताभ प्रेक्षकांकडे बघून विचारतात की मी बरोबर आहे की नाही ? मग अमिताभ असीमला त्याच्या लग्नातील अडचणींबद्दल विचारतात. विशेष म्हणजे ३ जून १९७३ रोजी अमिताभ आणि जयाचे लग्न झाले होते. दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत. या दोघांनाही अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन ही दोन मुले आहेत.
शादी के 46 साल: अमिताभ-जया के बीच इस बात को लेकर हो जाता है 'युद्ध'

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like