जनावराने धडक दिल्यानंतरही त्या वृद्धाची ८४ दिवस मृत्यूशी झुंज

इंदापुर | पोलीसनामा आॅनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापुरातील ६० वर्षे वयाच्या जेष्ठ नागरीकाला मोकाट फिरणार्‍या  जनावरांनी धडक दिली होती. मेंदुला जबर मार लागल्याने तब्बल ८४ दिवस मृत्युशी झुंज दिली. अशोक साळुंके या जेष्ठ नागरीकाला आज अखेर मृत्युने कवटाळले. संपूर्ण इंदापूर शहरावर शोककळा पसरली. तर एवढी गंभीर घटना घडून देखील नगरपरिषद प्रशासन अधिकारी, नगराध्यक्ष अथवा एकही नगरसेवक उपस्थित न राहील्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करण्यासाठी  सदर इसमाचा मृतदेह चक्क नगरपरिषदेच्या दारातच आणुन मांडला व घडलेल्या घटनेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणारे नगरपरिषद संबधीत प्रशासकीय अधिकारी यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मृतदेह येथुन हलविणार नसल्याची भुमीका घेवुन नातेवाईकांनी तब्बल तीन तास ठीय्या आंदोलन नगरपरिषदेसमोर केले. त्यामुळे नगरपरिषद परिसरातील आठवडी बाजारात तणावपूर्ण वातावरण बनले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ee181b7e-cfa9-11e8-bb47-c524b86b2c91′]

इंदापूर शहरातील (जुना) पुणे सोलापूर हायवे लगत असणार्‍या हाॅटेल आशोका समोर शहरातील जेष्ठ नागरीक अशोक शंकर साळुंके (वय वर्षे ६०) रा. वडार गल्ली इंदापूर यांना मोकाट फिरणार्‍या जनावराने दिनांक २३ जुलै २०१८ रोजी सायंकाळी सहा ते सात वाजणेच्या दरम्यान जोराची धडक दिली होती. या धडकेत अशोक साळुंके खाली जमिनिवर पडल्याने त्यांचे  मेंदूला जबर मार लागला होता. त्या दिवशीपासुन त्यांना अकलुज येथिल डाॅ. इनामदार हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल ५२ दिवस ते  अकलुज येथिल हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत होते. घरी आल्यानंतरही ते सतत मृत्युशी झुंज देत होते. साधारणत: साडे पाच लाख रूपरापर्यंत त्यांना दवाखाण्याचा खर्च झाला होता. रविवार दिनांक १४ आॅक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी मृत्युशी झुंज दीली. व रविवारी सकाळी त्यांचे दुख: द निधन झाले.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’333a7901-cfaa-11e8-bf41-f735f76cca70′]

तत्पुर्वी अकलुज येथे साळुंके यांचेवर उपचार सुरू असताना त्यांचे नातेवाईकांनी इंदापूर नगरपरिषद संबधीत विभाग अधिकारी, मुख्याधीकारी, गरसेवक,नगराध्यक्ष, तहसिलदार यांना तक्रार निवेदन देवुन आर्थिक मदतीसाठी विनंती केली होती. परंतु त्यांच्यापैकी कोणीही साधी वाचारपूस करण्यासाठी सुद्धा फिरकले नाहीत. तर या उलट दाखल तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टाळण्याचा  प्रयत्न केला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेहाचे दहन नगरपरिषदेसमोरच करण्याचा निर्णय घेवुन प्रेत नगरपरिषदेच्या दारात आणून ठीय्या आंदोलनास सुरूवात केली.

[amazon_link asins=’B07D5P3QWP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’72107086-cfaa-11e8-9622-3b7ba2ca6985′]

दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान इंदापुर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, काँग्रेस गटनेता कैलास कदम, राष्ट्रवादी गटनेता गजानन गवळी, नगरसेवक श्रीधर बाब्रस, अमर गाडे,भाजपाचे पांडूरंग शिंदे,अँड. राहुल मखरे, आनील पवार,संजय शिंदे,यां सर्वांनी मिळुन मयत आशोक सुर्यवंशी यांचे नातेवाईकांशी पोलिसांच्या मदतीने सविस्तर चर्चा केली. व बुधवार दिनांक १७ रोजी नगरपरिषद मिटींगमध्ये सर्वपक्षिय ठराव करून आर्थिक मदतीबाबतचा तोडगा काढून आर्थिक सहकार्य करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले व प्रकरण मिटवुन प्रेत अंत्यविधीसाठी हलविण्यात आले. यामध्ये इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडसे, सहाय्यक पोलिस निरिक्षक राम गोमारे, सहाय्यक पोलीस निरिक्षक राम गोमारे, यांनी या प्रकरणात महत्वाची भुमिका बजावताना दोन्ही बाजुच्या लोंकाशी चर्चा करून प्रकरण व्यमिटवून वातावरण शांत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजावली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

हा प्रकार घडल्यानंतर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा या बाबतचा ठराव नगरपषदेत अडीच महीण्यापूर्वी संमत करण्यात आलेला आहे. त्याची अमल बजावणी करणेबाबत नगरपरिषदेला वारंवार कळवुन देखील नगरपरीषदेने जानिवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळेच ही घटणा घडली. नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्षच याला कारणीभुत ठरल्याचे मत राष्ट्रवादी गटनेता गजानन गवळी, श्रीधर बाब्रस व अमर गाडे यांनी म्हटले आहे.