Coronavirus : ‘क्वारंटाईन’ संपल्यानंतर देखील रूग्णांची धक्कादायक माहिती, केडीएमसीनं केला ‘हा’ बदल

मुंबई, पोलिसनामा ऑनलाईन- मुंबईत कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात ६नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काहींना १४ दिवस क्वारंटाईन देखील करण्यात आले होते, परंतु १४ दिवसानंतर सुद्धा लक्षणे आढळली त्यामुळे क्वारंटाईन १४ दिवसावरून २८ दिवसांवर करण्यात आले आहे. कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १४३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत . नवे ६ रुग्ण जे आढळले त्यातील बहुतांश रुग्ण हे मुंबई येथे काम करणारे आहेत. या रुग्णांमधे एका न्यूजचॅनेलच्या रिपोर्टरचा देखील समावेश आहे. तसेच यामध्ये मुंबईत काम करणारा हॉटेलचा कर्मचारी, भाजी मंडईतील सुरक्षा रक्षक, दादर मधील खाजगी कंपनीचा अभियंता आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. यात एका १२ वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १४३ रुग्ण आढळून आले आहे. यापैकी ४५ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तसेच ऐकून ९५ रुग्णावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत केडीएमसीच्या परिसरात ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काहींना १४ दिवस क्वारंटाईन करून देखील लक्षणे आढळल्यामुळे २८ दिवसांपर्यंत क्वारंटाईन करण्यात येणार आहे