महामारी संपल्यानंतर सुद्धा घरातून काम करण्याची व्यवस्था सुरू राहिल : प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्याशी जोडलेले बिल गेट्स यांनी बुधवारी म्हटले की, घरातून काम करण्याची संस्कृती चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि अनेक कंपन्या कोरोना महामारी संपल्यानंतर सुद्धा ही व्यवस्था जारी ठेवतील. कोविड-19 महामारी आणि ती रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची सुविधा नाईलाजाने दिली होती.

गेट्स यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सच्या ऑनलाइन व्यापार संमेलनात म्हटले की, हे पहाणे अद्भूत आहे की, कशाप्रकारे घरातून काम करण्याची व्यवस्था काम करत आहे आणि मला आशा आहे की, महामारी संपल्यानंतर ही कार्य संस्कृती कायम राहिल.

मायक्रोसॉप्टचे सह-संस्थापक आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे संस्थापक गेट्स यांनी सांगितले की, त्यांनी या वर्षी आतापर्यंत कामानिमित्त कोणताही प्रवास केलेला नाही. ते म्हणाले, खरं सांगायचे तर मला खुप वेळ मिळाला आहे. हा डोळे उघडणारा आहे. मात्र, गेट्स यांनी म्हटले की, घरातून काम करण्याच्या काही समस्या देखील आहेत, यासाठी सॉफ्टवेयरमध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे.