खळबळजनक ! पोलिसाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचीसुद्धा आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता त्या महिलेच्या पतीनेसुद्धा एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याला आणि सासरकडील मंडळी यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या व्हिडिओनंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपूर्वी नेमकं काय म्हणाले?
महिलेच्या पतीने आत्महत्या करण्यापूर्वी शेअर केलेला व्हिडिओमध्ये, आत्महत्या करण्याचे कारण की हरिभाऊ कोळेकर यांनी माझा हसता खेळता परिवार उध्वस्त केला आहे. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या छळाला कंटाळून माझ्या पत्नीने आत्महत्या केली. “हरिभाऊ कोळेकर म्हणतो की माझे खूप दूर पर्यंत संबंध आहेत मी या प्रकरणातून सहज बाहेर पडेन” त्याला फाशी झालीच पाहिजे असे त्या महिलेच्या पतीने म्हणले आहे.

आत्महत्येचं अजून एक कारण ?
या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या आत्महत्यचे अजून एक कारण सांगितले आहे. या आत्महत्येमागे सासरची मंडळी आहेत असे त्याने सांगितले. सासरची मंडळी पूर्वी मला जावई देव माणूस आहे म्हणायचे. मात्र, पत्नीने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी मला अनेकदा शिवीगाळ देखील केली असल्याचे त्यांनी या विडिओमध्ये म्हटले आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत औसा तालुक्यातील टाका या गावामध्ये आत्महत्या केली.