डोनाल्ड ट्रम्प मुर्खतेचं ‘प्रतिक’ असल्याचं सुलेमानीच्या मुलीनं सांगितलं, म्हणाली – ‘वडिलांचा मृत्यू US – इस्त्राइलला बुरे दिन आणणणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेले इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांची मुलगी जैनबने समोवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेड्याचं आणि मुर्खतेचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू अमेरिका आणि इराण यांच्यासाठी वाईट दिवस घेऊन येईल असंही ती म्हणाली. शुक्रवारी अमेरिकेनं बगदाद एअरपोर्टवर ड्रोन हल्ला करत कासिस सुलेमानी यांना ठार केलं होतं.

तेहरान विद्यापीठात वडिल्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान लोकांना संबोधित करताना जैनब म्हणाली, “माझे वडिल आणि इराकचे मिलिशिया नेता अबु महदी अल महांदिस यांची हत्या करत इराक आणि इराण यांना वेगळं करण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन अयशस्वी झाला. याचे कारण म्हणजे दोन्ही देशातील ऐतिहासिक एकता. ज्याची अमेरिकेला चीड आहे.” यावेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई सहित अनेक नेते उपस्थित होते.

रविवारी सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला
इराकची राजधानी बगदादमध्ये रविवारी अमेरिकन दूतावासावर दोन रॉकेट डागण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी याबाबत माहिती दिली आहे. इराकच्या संसदेने रविवारी अमेरिकन आणि परदेशी सैनिकांना देशाच्या बाहेर पाठवण्याच्या बाजूने मतदान केलं. या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर कठोर प्रतिबंध लावण्याची धमकी दिली. इराकमध्ये 5200 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. त्यांना 2014 मध्ये दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटसोबत लढण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/