‘या’ वयातसुद्धा शरद पवारांना फिरावे लागतं हे ‘क्लेषदायक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षाला गळती लागल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत आहे. शरद पवार हे राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र, या वयात त्यांना फिरावे लागते हे क्लेशदायक असल्याचे मत शिवसंग्रामचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार विनायक मेटे हे आज शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्ते मेळाव्यात बोलत होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विनायक मेटे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार फिरत आहेत ते पाहून दु:ख होत आहे. पक्षात स्वत:ला तरुण समजणाऱ्या नेत्यांनी आता ही जबाबदारी उचलायला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने शरद पवार स्वत: फिरत आहेत हे क्लेशदायक चित्र आहे.

अन्यथा स्वतंत्र लढणार…
निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर मित्र पक्षांचे जागा वाटप होईल. त्यानंतर भाजप-शिवसेनेच्या जागांचे वाटप होईल असे सांगितले होते. मात्र, तसेच होताना दिसत नाही. युतीची चर्चा होत असताना भाजपने आपल्या घटक पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. जर युती झाली नाही तर शिवसंग्राम पक्ष स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढवण्यास तयार असल्याचा इशारा मेटे यांनी भाजपला दिला आहे.

Visit : policenama.com