वयाच्या चाळीशीमध्येही मलायका अरोरासारखी ‘हॉट’ अँड ‘स्लिम’ फिगर हवीय, मग फक्त ‘हे’ काम करा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या फिटनेसमुळं आणि हॉट फिगरसाठी फेमस आहे. तिच्याकडे पाहून कोणीच तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. नियमित योगा, वर्कआऊट आणि डाएट हेच तिच्या फिगरचं गुपित आहे. आज आपण हे जाणून घेणार आहोत की, ती कोणती योगासनं करते. ज्यांना तिच्यासारकी फिगर हवी आहे ते ही योगासनं करू शकतात.

1) हँड स्टँड- पुढीलप्रमाणे कृती करा.

– भिंतीपासून काही इंच दूर रहा.
-दोन्ही हात जमिनीवर ठेवा.
-एक पाय गुडघ्यात वाकवा आणि दुसरा वर उचला.
– आता दुसराही पाय उचला.
– काही सेकंद याच स्थितीत रहा आणि श्वासोच्छ्वास रोखून ठेवा.

2) सपोर्ट हेड स्टँड- पुढील कृती फॉलो करा.

– वज्रासनात बसा आणि गुडघे जमिनीला टेकवा.
– श्वासोच्छवास सुरू ठेवा. नंतर डोकं जमिनीवर ठेवा.
– श्वास घेत पायांच्या टाचा वर उचला आणि पाय सरळ ठेवा.
– पाय जराही फोल्ड होता कामा नये.
– हात आणि पायांची बोटं जमिनीवरच असू द्या. आता पर्ण शरीराचा भार डोक्यावर येईल.
– आता दोन्ही हात पाठीमागे न्या आणि बोटांची एकमेकांत गुंफन करून मागील बाजूनं हलकेच खेचा.
– ही झाली सपोर्ट हँडस्टँडची अंतिम स्थिती
– तीव्र मानदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखी असल्यास या आसनाचा सराव करू नये.

3) पद्म बालासन-

– सर्वात आधी जमिनीवर बसा. पाय समोरच्या दिशेला सरळ पसरवा.
– डावा पाय गुडघ्या वाकवत छातीजवळ न्या. पायाचा पंजा उचलून उजव्या मांडीवर ठेवा.
– तसंच आता उजवा पाय गुडघ्यात वाकवत छातीजवळ न्या आणि पायचा पंजा उचलून डाव्या मांडीवर न्या. हे आह पद्मासन.
– आता दोन्ही हात जमिनीवर ठेवा. क्षमतेनुसार आता हात पुढे सरकवत न्या.
– तुमचे कोपर जमिनीला टेकवा.
– याचदरम्यान कंबर वरील बाजून उचलली जाईल आणि आता शरीराचा सर्व भार गुडघ्यावर असेल.
– ही झाली पद्म बालासनाची अंतिम स्थिती.

सपोर्ट हेड स्टँडचे फायदे-

– स्मरणशक्ती वाढते.
– विसरण्याचे आजार दूर होतात.
– मानसिक आरोग्यसाठी लाभदायक
– चेहऱ्यावर ग्लो येतो.
– मेंदूच्या भागाला उत्तम रक्तप्रवाह मिळतो.
– रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी हे आसन करू नये.
– याव्यतिरीक्त मानदुखी, पाठदुखी, हातांचे दुखणे ज्याला आहे त्यानं हे आसन करू नये.

पद्म बालासनाचे फायदे-

– मानदुखी आणि कंबरदुखी पासून सुटका
– श्वासोच्छवासाच्या समस्या कमी होतात.
– मन आणि मेंदूतला तणाव दूर होतो.
– शारीरिक आणि मानसिक थकवा जातो.

योगासनं करताना ‘ही’ काळजी घ्या

कोणतंही आसन आधी शिकून घ्या आणि योग प्रशिक्षकांसमोरच करा. कारण एखादी लहान चूकही तुम्हाला महागात पडू शकते.