PM मोदींच्या मुंबई दौऱ्याआधीच CM ठाकरेंपासून फडणवीसांपर्यंत सगळेच नेते Action मोडमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि.19) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची हवाई पहाणी करणार आहेत. पंतप्रधानांचा मुंबई दौरा धावता असून ते फक्त विमानातूनच पाहणी करणार असले, तरी राज्यात त्यामुळे राजकारणाला गती आल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी संध्याकाळी राज्यातले सर्वच प्रमुख राजकीय नेते कुठल्या ना कुठल्या बैठकीत होते. सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या तीन महत्त्वाच्या बैठकांमध्ये व्यस्त होते.

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी (दि.18) संध्याकाळी झाली. तर विरोधी पक्षांची देखील एक बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. बुधवारी कॅबिनेटची बैठक असून यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले, काही अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत चर्चा झाली. महामंडळ आणि समिती नेमणुकीचीही चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतली. या बैठकीला अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, असे समजतेय. त्यांची अनिल परब यांच्यासोबत दुसरी बैठक सरु होती.

याआधी दुपारी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत पत्रकार परिषद घेतली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार समितीची बैठक झाली. 31 मे रोजी ही समिती अहवाल सादर करेल. त्यानंतर मराठा आरक्षण विषयी राज्य सरकार पुढील भूमिका ठरवेल, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटावे, असा टोला लगावला.