PM मोदींच्या घोषणेपूर्वीच नितीन गडकरींची ‘आत्मनिर्भरता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.12) देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी त्यांनी जनतेला आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. यावेळी त्यांनी भारताने अधिक स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, कोरोना संकटाच्या आधी एकही पीपीई किट बन नव्हतं.

न-95 मास्कचं उत्पादन अगदी कमी होतं. आता स्थिती आहे, की भारतात दररोज दोन लाख पीपीई किट आणि मास्कचं उत्पादन होत आहे. यानंतर देशाने अधिक आत्मनिर्भर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच नागपूरता कोरोनाच्या संकटासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू तयार केल्या आहेत. नितीन गडकरी यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात माहिती दिली. त्यांनी नागपूरला एकाकडून सीएसआरमधू एक कोटी रुपये घेतले. त्यातून त्यांनी 15 हजार पीपीई किट घेतल्या आणि अनेक रुग्णालयांना त्या मोफत दिल्या. नागपूरात एमईसीएचा रेडिमेंट गारमेंट झोन आहे. त्याठिकाणी 1200 महिला काम करतात. महाराष्ट्रात हव्या तेवढ्या पीपीई किट्स केवळ नागपूरमधून मिळू शकतात, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

गडकरी यांनी पुढे सांगितले की, पीपीई किट्सची किंमत 1200 रुपये होती. या ठिकाणी 650 रुपयांत मिळते. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्याबाबत सर्व अहवाल आहेत. गरज लागल्यास मुंबईत कमीतकमी 25 हजार प्रतिदिन ताबडतोब 2 ते 3 लाख किट्स पाठवता येतील. इतकच नाही तर साखर कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्याची परवानगी दिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या कारखान्यांमधून गडकरी यांनी एक लाक सॅनिटायझरच्या बाटल्या मोफत वाटल्या आहेत. जे पूर्वी 1200 रुपये लिटर होते ते आता 400 रुपये लिटर झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.