‘मी असे पर्यंत शहरात अवैध धंदे चालू देण्याचा विचारही मनात आणू नका’ : आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आपण जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे जनतेच्या तक्रारी दाखल करुन, समस्या सोडवा. शहरात मी असे प्रयत्न अवैद्य धंदे चालू देण्याचा विचारही मनात आणू नका; अन्यथा माझ्या कारवाईला सामोरे जावे लागेल अशा कडक शब्दात नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सुनावले आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 5 सप्टेंबर रोजी पदभार स्विकारला. त्यानंतर आज 11 व्या दिवशी त्यांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांची मिटिंग घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर मला पहिले अभ्यास करु द्या, माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करु द्या, त्यांच्या समस्या जाणून घेऊ द्या, असे पोलीस आयुक्तांनी मीडियाला सांगितले.

आज बुधवारी 11 व्या दिवशी पोलीस आयुक्तांनी मिटिंग घेतली आणि सर्वांना कडक भाषेत पोलिसांच्या कामाची आणि अधिकाराची जाणीव करुन दिली. मी असे प्रयत्न शहरात किंवा तुमच्या हद्दीत अवैध धंदे चालू राहतील असे प्रथम विसरून जा. आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या तक्रारी घ्या, त्यांना न्याय द्या. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणीही काम करु नका. मी प्रथम सर्वांना सांगतो.

जो कोणी अधिकारी, कर्मचारी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करेल, त्यांच्यावर मी कारवाई करणार, त्यामुळे सर्वांनी त्या पध्द्तीने काम करा, असे सांगितले. याच बरोबर हद्दीतील पेंडीग गुन्हे, गुन्ह्यांचे प्रकार, अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या यावर चर्चा केली. चार विभागात आज पहिली पोलीस आयुक्त ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिटिंग झाली आहे.