उन्नाव रेप : 100 % गुन्हे कमी होतील याची ‘गॅरंटी’ भगवान राम देखील घेऊ शकत नाहीत, सरकारमधील मंत्र्यांनं सांगितलं (व्हिडिओ)

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे अन्न, रसद व नागरी पुरवठा राज्यमंत्री रणवेंद्र प्रताप सिंह उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात वादग्रस्त विधान केले आहे. समाजात 100% गुन्हे कमी होण्याची हमी भगवान राम सुद्धा देऊ शकत नाहीत असे ते म्हणाले आहेत. आज गुरुवारी बाराबंकी जिल्ह्यात विभागीय आढावा बैठकीस हजर होण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी हे विधान केले आहे.

रणवेंद्र प्रताप सिंह उर्फ धुन्नी सिंह म्हणाले की, ‘योगी आणि मोदी यांच्या सरकारमध्ये आरोपींना संरक्षण मिळत नाही. समाजात 100% गुन्हे होणार नाही. याची हमी भगवान राम सुद्धा देऊ शकत नाहीत.’

उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. 5 आरोपींनी पीडितेला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मुलगी 90 टक्के जळाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like