Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. राज्यातील नेते अन् मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही खेळ सुरू केला आहे, पण मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे  यांनी रायगडावरून sambhaji raje from raigad दिला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल होतं. त्यामुळे कोल्हापूरमधून 16 जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी यावेळी केली.

शिवराज्यभिषेक सोहळा रविवारी (दि. 6) रायगडावर उत्साहात साजरा झाला.
यावेळी खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरून sambhaji raje from raigad मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आपली भूमिका स्पष्ट केली.
लढाई आपल्यामध्येच कशाला करायची, मी काही राजकारणी नाही, राजकारण करणार नाही, मराठा समाजाला वेठीस धरणार नाही.
जर काही चुकल असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, दिशाभूल करण्याचे रक्त आमच्यात नाही, असे खासदार संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षणाचा लढा आपण लढत आहोत, काही लोकं नाराज झाले तरी चालतील.
कुणाचीही दिशाभूल करणार नाही.
पण आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे.
शिवाजीराजेंनी जे कार्य समाजासाठी केले होते. तेच आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. पण आता कोरोनाचे संकट असल्याने आपल्याला काहीच करता येत नाही. माझ काही चुकल असेल तर दिलीगिरी व्यक्त करतो, असे संभाजीराजे म्हणाले.

 

READ ALSO THIS :

Lockdown in Pune : …म्हणून पुण्याची तिसर्‍या स्तरात घसरण

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी प्या ‘हा’ स्पेशल ज्यूस; जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – ह्रदय शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहचवणे, सर्व भागातून रक्त घेणे, रक्त पंप करणे अशी महत्वाचे कामे हृदय करते. हे काम करताना हृदय heart healthy आकुंचन आणि प्रसरण पावत असते. या कार्यात बाधा आल्यास हृदयसंबंधी heart healthy आजारांचा धोका वाढतो. यासाठी योग्य दिनचर्या, योग्य आहार आणि रोज व्यायाम करा. सोबतच रोज सकाळी रिकाम्यापोटी हा स्पेशल ज्यूस प्या.

जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर जाणून घेवूयात…
रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका शोधात या फळाबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे. या फळात आयुर्वेदिक गुण आढळतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. विशेषकरून लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, तणाव आणि हृदयासंबंधी आजारासाठी हे फळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. डॉक्टरसुद्धा किवीचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

संशोधनात सांगितले आहे की, किवीमध्ये पोटॅशियम आणि फायबर आढळते. याच्या सेवनाने हृदय निरोगी राहते. किवीतील फायबर वाढत्या कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करते. यामुळे हृदयसंबंधी आजार आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.यासाठी कोरोना काळात रोज रिकाम्यापोटी किवी ज्यूस प्या. याशिवाय रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका अन्य संशोधनात उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी आठवड्यात 8 किवी खाण्याचा सल्ला दिला आहे.