MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

सिंधुदुर्ग न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  शिवसेनेला (Shiv Sena) शह देण्यासाठी भाजप खासदार नारायण राणेंना (Narayan Rane) केंद्रांत मंत्रिपद देण्यात आले. अशा चर्चा राज्यात होत आहेत. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र केंद्रातील मंत्रिपदावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नारायण राणे यांचा शिवसेनेकडे (Shiv Sena) आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही आणि याच गोष्टीचे दुःख वाटते, असे म्हणतानाच नारायण राणे यांना भाजपने सूक्ष्म उद्योग मंत्री करावे, अती वरिष्ठ मंत्री करावे किंवा थेट पंतप्रधान करावे, याचे शिवसेनेला दुःख वाटण्याचे कारण नाही, असं विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले, ‘भाजपाला नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद द्यायचे होते, ते त्यांनी दिले आहे.
आता तिथे सुखाने रहावे. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे कोणाला दुखवू नका, असा टोला देखील विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
राणे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत भाष्य केले होते.
आपल्याला शुभेच्छा देण्याएवढे मुख्यमंत्र्यांचे मन मोठे नाही असे नारायण राणे यांनी म्हणाले होते.
त्यावर खा. विनायक राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या दरम्यान, ‘उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत.
कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

Web Title : even if narayan rane is made the prime minister there is no reason for shiv sena to feel sad says shiv sena mp vinayak raut

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BMC | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा?, पालिका घेणार लवकरच निर्णय

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांची पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट

Jimmy Shergill | अटकेप्रकरणी जिमी शेरगीलचा उलट आरोप; म्हणाला – ‘पोलिसांनी राईचा पर्वत केला’