मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली तरी मी काँग्रेस मध्येच जाणार : संजय काकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली तरी मी काँग्रेस मध्ये जाणारच असे खासदार संजय काकडे यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री आणि खासदार संजय काकडे यांच्यात झालेल्या बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

भाजपवर नाराज असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा जाहीर केली होती. दरम्यान त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपकडून त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. त्यावेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय काकडे यांच्यात बैठक झाली. दरम्यान माझे आणि भाजप मधील नेत्यानं सोबत जमत नाही. मी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार हे निश्चित आहे. आणि लवकरच काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. असे खासदार संजय काकडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आज झालेल्या बैठकीत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा विचार सांगितला. आणि मी आणि मुख्यमंत्री चांगले मित्र आहोत. मी दुसऱ्या पक्षात जाणार म्हणजे मैत्री तोडणार असे नाही. मी आजही त्यांना भेटतो, काँग्रेस मध्ये प्रवेश केल्या नंतरही त्यांना भेटेल. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, खासदार काकडे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचंड मेहनत घेतली होती. भाजपचे नगरसेवक मोठया प्रमाणावर निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासुन त्यांचा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून सन्मान राखला जात नव्हता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देखील दिली होती. अद्यापही त्यावर निर्णय न झाल्यामुळे अखेर खासदार संजय काकडे यांनी भाजप साडेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. याचसदरम्यान संजय काकडे यांची मनधरणी करण्यासाठी सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. आज या तिघांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठकही झाली. त्यानंतर त्यांनी या बैठकीत काय झाले हे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे खासदार संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला विशेषतः त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांना यश आले नसल्याचे दिसून आले आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

महात्मा गांधींचा भारत हवा की गोडसेचा हे जनतेनेच ठरवावे

लोकसभेच्या निवडणुकीमुळे CAची परीक्षा पुढे ढकलली

पुणे-बंगळूर महामार्गावर पावणे दोन कोटीचा गुटखा जप्त

नोकरीच्या अमिषाने तरुणीला ५० हजारांचा गंडा

सुरेखा पवार यांना गुरू-शिष्य पुरस्कार बबन माने यांचाही होणार गौरव

Loading...
You might also like