तरी देखील पत्नीला पतीपासुन गर्भधारणेचा अधिकार : कौटुंबिक न्यायालय

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – पती-पत्नीत बिनसल्यानंतर न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल नांदेड कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

डॉ. लक्ष्मी (नाव बदलले) यांचे लग्न मुंबई येथील डॉ. कुंतल पाल यांच्याबरोबर २०१० मध्ये झाले होते. मुलगा झाल्यानंतर काही वर्षानी पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. डॉ. लक्ष्मी हिने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले. दरम्यान डॉ. कुंतल पाल यांनी पत्नीपासून फारकत मिळावी म्हणून प्रकरण दाखल केले.

विलंब लक्षात घेता डॉ. लक्ष्मी हिने पतीपासून बाळ व्हावे व तिला बाळ जन्माला यावे अशी इच्छा व गरज दाखविणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. डॉ. पाल यांनी या अर्जाला विरोध केला. डॉ. लक्ष्मी हिने पोटगीची कार्यवाही केली आहे. त्यांच्या पहिल्या मुलाला १२ हजार रुपये पोटगी मंजूर झाली असून दुसरे बाळ जन्माला आल्यास तो सुद्धा पोटगी मागू शकतो.

वाद असताना पत्नी पतीकडून गर्भधारणा करण्याची मागणी करू शकत नाही, असा युक्तीवाद डॉ. पाल यांच्या वकिलांनी केला. १९९२ च्या जीआर नुसार दोन मुलांपर्यंत जन्माला घालण्याचा अधिकार आहे, असा युक्तीवाद लक्ष्मी हिच्या वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने वरील निकाल दिला.

आरोग्य विषयक वृत्त

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’