अखेर बारणे-जगताप यांच्यात मनोमिलन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –मावळ लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अखेर मनोमिलन झाले आहे. संयुक्त पत्राकर परिषदेत या दोघांनी मनोमिलन झाले असल्याचे जाहिर केले. बारणे आणि जगताप यांच्या समेट झाल्याने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत भर पडली आहे.

बारणे-जगताप यांच्यात राजकिय वैर सर्वश्रृत आहे. हे दोन नेते एकत्र यणार की नाही याची चर्चा सुरु होती. बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचारात एकदाही लक्ष्मण जगातप सहभागी झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनोमिलन घडवून आण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मध्यस्थी केली. यापूर्वी देखील महाजन यांनी मध्यस्थी केली होती. तरी देखील लक्ष्मण जगताप यांनी बारणे यांच्या प्रचारात सहभाग घेतला नाही.

रविवारी पुन्हा एकदा महाजन, बारणे आणि जगताप यांच्यात बैठक झाली. अखेर महाजन यांना या दोन नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले. आज या दोघांनी संयुक्त पत्राकर परिषदेला हजेरी लावली. शहरातील या दोन्ही नेत्यांची भेट म्हणजे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी राजकीय घडामोड आहे. दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण जगताप यांनी युतीचा धर्माचे पालन करू अशी हमी यावेळी दिली.

मतभेद होते… मनभेद नव्हते
आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आजपर्यंत केलेल आरोप राजकीय दूरदृष्टिकोनातून केले होते. आमच्यात वितुष्ट नव्हते. देशहित डोळ्यासमोर ठेवून मी एक पाऊन मागे घेतले असून जगताप यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत असल्याचे मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तर आम्हा दोघांमध्ये मतभेद होते. मनभेद नव्हते असे पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. देश आणि पक्षहित पाहून एक पाऊन मागे घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.