अखेर ‘त्या’ महिला IPS अधिकाऱ्याची उचलबांगडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- दलित आणि अ‍ॅट्रोसिटी विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री बाबूराव नवटके यांची बीडवरुन औरंगाबादला बदली करण्यात आली होती.  नवटके यांना औरंगाबाद येथे राज्य गुप्तवार्ता विभागात संलग्न करण्यात आले होते. त्यानंतर एक महिन्याने त्यांची कणकवली उप विभागाच्या सहायक पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बीडमधल्या माजलगावच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हिडीओ क्लिपमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात आडकल्या होत्या. या मोबाईल क्लिपमध्ये त्यांनी दलित आणि मुस्लिम तरुणांना मी कशी मार देते, याचा उल्लेख केला होता.

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंविरोधात अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून, त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली होती. तर बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तूर्तास या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत त्यांना औरंगाबाद राज्य गुप्तवार्ता विभागात संलग्न करण्यात आले होते. नवटके यांना कणकवली उप विभागाच्या सहायक पोलीस अधीक्षकपदी नियुक्त करून राज्य शासनाने त्यांना परत एकदा फिल्डवर पाठवले आहे.

काय म्हणाल्या नवटके?

मी 6 महिन्यांत 21 दलितांन फोडलंय… फोडलंय ना..?
मुस्लिमांना फोडलंय..सगळ्यांना एवढा स्ट्राँग मेसेज दिलाय की मॅडम कुणालाच सोडत नाही.
तुम्हाला माहित आहे का दलितांना कसं मारतो आम्ही? पाय बांधून, हात बांधून मारतो आम्ही..