Everest Base Camp | तिरंगा, भगवा फडकवत केली एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम फत्ते ! गिर्यारोहक रॉबिन हिंगणेकर, बाबा भोईर यांचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Everest Base Camp | एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करायचा तर मन आणि शरीर दोन्हीही उत्तम असणे आवश्यक. ऐव्हरेस्ट बेस कॅम्प हे आमच्यासाठी एक मोठे आव्हान होते. पण आमचा निर्धार पक्का होता. दैनंदिन जीवनातील नेहमीच्या अडचणी सुरूच होत्या; पण तिकडे दुर्लक्ष केले. ‘अत्ता नाही तर कधिच नाही’ अशी खूणगाठ मनाशी बांधून बेस कॅम्प गाठायचा निर्धार केला.(Everest Base Camp)

या उपक्रमात गिर्यारोहक व नुकतेच एव्हरेस्ट सर करून आलेल्या ऐवरेस्टवीरंगना सुविधा कडलग यांच्या सहमार्गदर्शना खाली मि रॉबीन हिंगणेकर, बाबा भोईर,अतुल कोल्हापुरे,सुरज कोडे या आम्ही पाच जणांनी सहमाग घेतला.

नुकतेच एव्हरेस्ट सर करून आलेल्या ऐवरेस्टवीरंगना मॅडम सुविधा कडलग यांच्या कडुन टिप्स घेतल्या. “अर्ध्या अर्ध्या तासांने गरम पाणी प्यायचे. अगदी हळूहळू चालायचे. आपली स्पर्धा कासवाशी आहे, हे विसरायचे नाही.” त्यांनी दिलेल्या ह्या मंत्राचे आम्ही तंतोतंत पालन केले. बेस कॅम्पच्या पलीकडे जाऊन सारा हिमालय आपल्याला साद घालत आहे, असे वाटू लागले.

नोंदणी व इतर अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता, खरेदी झाल्यावर ८ ऐप्रिलला आम्ही पहाटेच मुंबईहून विमानाने निघालो आणि सव्वादोन तासात काठमांडूला पोहोचलो. आमचा प्रवास प्रचंड उत्साह आणि चैतन्य दाटून आले होते. आमचे खंदे गिर्यारोहक सुविधा कडलग मॅडम हे आमचे नेतृत्व करणार होते. नेपाळमधील मोहिमेची सूत्रे ‘माऊंटन ग्रेट ऐडवेंचर’ या संस्थेच्या हाती होती. तिचे प्रतिनिधी श्री. राम थापा आणि त्यांची टीम (पोर्टर) मदतीसाठी सोबत असणार होती.

आमची सहा जणांची टीम एका गाडीने काठमांडू वरून रामेछापकडे रवाना झाली. उजाडता उजाडता रामेछापला पोहोचलो. पण खराब हवामान असल्याने ऐक दिवस ऐअर पोर्ट बंद केल्याने आम्हीला रामेछापला मुक्काम करावा लागला. तेथून एका छोट्या विमानाने काळजात धडकी भरवणारा अर्ध्या तासाचा प्रवास करून लुक्ला येथे पोहोचलो. तेथून ट्रेकचा आरंभ होतो. आवश्यक ते परवाने वगैरे घेऊन मजल दरमजल करत बेस कॅम्पच्या दिशेने निघालो.

पहाटे नाश्ता करून निघायचे. दिवसभर चालायचे. …दुपारी वाटेत कुठेतरी डाळ-भात, कोबीची भाजी, पापड असे नेपाळी जेवण. पुन्हा वर वर चढत सूर्य मावळण्याच्या सुमारास नव्या मुक्कामी पोहोचायचे असा दिनक्रम. मुंबईतून निघताना आणि लुक्ला येथे पोहोचेपर्यंत इतकी धावपळ आणि दगदग झाली होती की अर्धी शक्ती संपलेली होती. पुढचा सूर जुळणे अवघड जात होते. यूट्युबवर दिसणारा सोपा-सुलभ आणि रम्य बेस कॅम्प प्रत्यक्षात किती जीवघेणा आहे, हे हळूहळू लक्षात येऊ लागले होते.

हाडे गोठवणारी थंडी, बेलाग पर्वत, पाय उचलला तर गुडघे छातीला लागावेत अशा चढणी, तसेच तीव्र उतार, विरळ होत गेलेली हवा, रक्तात कमी होत गेलेला प्राणवायू, पायातील अवजड बूट, अंगावरील कपड्यांचे थर, अवजड थर्मास, पाठी वरिल १० – १२ कीलोची बॅग , हातातील काठ्या असे सारे सांभाळत चालायचे होते. पाय सटकला की कपाळमोक्ष आणि लहानसहान दुखापत झाली तरी मध्येच थांबावे लागून स्वप्नाची समाप्ती! त्यामुळे चालताना कमालीची दक्षता घ्यावी लागत होती. अनेकदा मनात यायचे की ‘फिरूया आता मागे’ पण इतक्या वर्षांचे स्वप्न पुन्हा समोर उभे राहायचे….

एव्हरेस्ट बेस कॅम्प हा जगातील सर्व गिर्यारोहकांचा लाडका ट्रेक. सर्वांनाच आकर्षित करणारा. रौद्र-भीषण; पण तितकाच नितांतसुंदर! ज्या रस्त्याने शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी एव्हरेस्टवर गेले त्याच रस्त्याने आपण जाणार, कालिदासांनी ज्याचे वर्णन केले आहे त्या हिमालयाला भेटणार, जगातील सर्व साधकांच्या आध्यात्माचा प्रवास जेथे थांबतो तेथे आपणही पोहोचणार हे वास्तव आयुष्य ओवाळून टाकावे असे होते! परतीचे दोर कापून टाकले आहेत; असे मनाला बजावत पुढील प्रवास सुरू ठेवला. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली गिर्यारोहकांची पथके जागोजागी दिसत होती. देशोदेशीचे गिर्यारोहक आनंदाने बेहोश होऊन जल्लोष करत असायचे. त्यात म्हातारी माणसे होती, तरुण मुले-मुली होत्या.

तिसऱ्या दिवशी सकाळी दीड-दोन तासांचा खडतर प्रवास करत एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंट परिसरात शिरलो. नितांतसुंदर, अविस्मणीय निसर्ग. समोर अमा दबलम, ल्होत्से, नुप्त्से आणि माउंट एव्हरेस्ट ही शिखरे! नजरेत साठवून घेत आम्ही पुढे पुढे जात राहिलो. आयुष्य सार्थकी लागल्याची खरी जाणीव तेथे झाली. नवी शक्ती, नवे चैतन्य अंगात सळसळू लागले. पुढे जाताना शरीर-मनाची अधिक परीक्षा सुरू झाली; पण आता त्याची पर्वा नव्हती! अंगावर कपड्यांचे चार-चार थर असायचे. हातमोजे, कानटोप्या, मफलरी, गरम पाण्याचा थर्मास सांभाळताना नाकी नऊ यायचे. …रात्री बाथरूम मध्ये जायच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा यायचा. हात धुवायचे तरी तेथील पाण्याचा बर्फ झालेला! एकाने दुसऱ्याला मदत करायचा प्रश्नच नव्हता; कारण प्रत्येकजण आपापल्या विवंचनेत अडकलेला. पुन्हा पहाटे उठायचा ताण आणि नव्या पर्वतरांगांचे आव्हान! हे सर्व आपण का करत आहोत, असा प्रश्न पुन:पुन्हा पडायचा. उत्तर एकच… ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ नावाच्या चेटूक करणाऱ्या मृगजळापर्यंत पोचण्याची तृष्णा! ती नसती तर जीवनाला अर्थ तरी काय उरणार होता? प्रत्येक कलावंताला असे एखादे मृगजळ आयुष्यभर झुलवत उभे असतेच!

रोज पंधरा-वीस किलोमीटरची खडतर वाटचाल. आम्हा सगळ्यानां जागोजागी थांबावे लागायचे. काही ठिकाणी दर चार-पाच मिनिटांनी विश्रांती घ्यावी लागायची.शेवटचा मुक्काम गोरखशेप येथे पडला. तेथून चार तासांच्या अंतरावर बेस कॅम्प! रस्ता असा नव्हताच. मोठमोठे शिलाखंड, कातळ-कडे आणि लक्षावधी वर्षांच्या हिमनदीचा ओबडधोबड गाळ! तो पार करता करता अखेर पृथ्वीच्या तिसऱ्या ध्रुवाचा तो ‘डेड एण्ड’ दूरवर दृष्टीपथात आला! तोवर शरीराने आणि मनाने पूर्ण कोलमडून पडलो होतो.

“अजूनही परत फिरता येईल” अस मनात यायचे, मग नव्या निर्धाराने पुढचे पाऊल उचलले. जवळपास तासाभराच्या खडतर प्रवासाने जेव्हा बेस कॅम्प पाशी पोहोचलो तेव्हा तेथील तापमान होते उणे विस अंश सेल्सिअस! पण आता कोणत्याच वेदना जाणवत नव्हत्या. इतक्या वर्षांचे स्वप्न साकार झाले होते. अविश्वसनीय अशा १७,५९८ फूट उंचीवर नेटाने पोहोचलो होतो. जीवाची तगमग थांबली होती. आणखी काही मिळवायचे राहिले नव्हते. त्या क्षणी तेथे एक साक्षात्कार झाला! अनुभव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट! त्या नव्या जाणीवेने मन एकदम उजळून निघाले. तेथून निघताना आठवण म्हणून एक छोटा दगड उचलला आणि खिशात ठेवला…. तो आता माझ्या टेबलावर विराजमान झालेला आहे. जणू मला मिळालेले एक अर्थपूर्ण आणि तितकेच निरर्थक सन्मानचिन्ह!

याबाबत 47 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी आवश्यक जमिनीचे अंतिम दर निश्चित करण्यात आले असून भूसंपादन झालेल्या जमीनधारकांना मोबदला दिला जात आहे. तक्रारदार यांची जमीन पश्चिम चक्राकार रस्त्यासाठी (रिंग रोड) संपादित होत आहे. या जमिनीची नुकसान भरपाई मोबदला म्हणून तक्रारदार यांना 34 लाख 20 हजार 348 रुपये मिळणार होते. तक्रारदार यांच्या त्या जागेच्या 7/12 उताऱ्यावरील पोकळीस्त असलेली नोंद तहसिलदार कार्यालयाकडून कमी करायची होती. ती नोंद कमी करण्यासाठी तक्रारदार यांचे अर्ज प्रकरण हवेली तहसीलदार कार्यालय येथे प्राप्त झाले होते.

या अर्जाची पोकळीस्त नोंद कमी करण्यासाठी अव्वल कारकुन नरेंद्र ढोले याने तक्रारदार यांच्याकडे तहसीलदार यांच्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची 8, 9, 14, 15 , 20 फेब्रुवारी व 20 मार्च रोजी पडताळणी केली. यावेळी अव्वल कारकुन नरेंद्र ढोले याने तहसीलदार यांच्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ढोले याच्यावर खडक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबी पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”