मोहिम फत्ते केल्यानंतर महाराष्ट्रातील ‘या’ एव्हरेस्टवीराचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अकलूजचे सुपुत्र व एव्हरेस्टवीर निहाल बागवान यांचा एव्हरेस्ट मोहिम फत्ते केल्यानंतर श्वसनाच्या त्रासामुळे निधन झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानादेखील त्यांनी शिखरे सर केली होती. परंतु काल एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांचे निधन झाले.

निहाल बागवान यांनी गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला होता. मात्र ते परतत होते. त्यावेळी बेस ४ वरच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेस कॅम्प क्रमांक ४ वरच निहाल यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत पुण्याची १, दिल्लीतील १ गिर्यारोहक युवती होती. त्यात त्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आनंद जास्त काळ टिकला नाही.

निहाल बागवान यांनी सकाळी साडेसहा वाजता एव्हरेस्ट सर केला मात्र परत येत असताना त्यांच्याजवळील ऑक्सीजन संपले. बेस कॅम्प ४ वर निहालचा मृत्यू झाला. मात्र त्याने एव्हरेस्ट सर केल्याची बातमी समजताच अकलूजमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात येत होता. परंतु तो आनंद जास्त काळ टिकला नाही. गुरुवारी सायंकाळी परतत असताना रात्री ८ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या गाईडकडून सांगण्यात आले. त्यांना विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिल्लीत फोन करून यंत्रणांना तपासाची विनंती केली.

You might also like