”हर कुत्ते का दिन आता है.”इस कुत्ते का आ गया,  ३० कोटींचा कुत्रा !

वृत्तसंस्था : कुत्रा हा पृथ्वीवरील सर्वात इमानदार प्राणी समजला जातो. ठिकठिकाणी त्याची उदाहरणेही बघायला मिळतात. कुत्रा हा माणसाचा अतिशय चांगला आणि जवळचा मित्र असतो. पण कधीकधी ही मैत्री मिळवण्यासाठी अनेकांना लाखोंची रक्कम खर्च करावी लागते. महत्वाची गोष्ट म्हणजे कुत्रा पाळण्याचे शौकीन लोक या किंमतीची पर्वा करत नाही. पण एखादा कुत्रा विमानापेक्षाही जास्त किंमतीत खरेदी करण्यात आला असे तुम्ही ऐकले आहे का?  पण हे सत्य आहे. एका डॉगची किंमत 15 ते 30 कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या किंमतीत एखादे छोटे विमान खरेदी केले जाऊ शकते.
– राजस्थानची राजधानी जयपुरच्या दशहरा मैदानात एका डॉग शोचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील 40 ब्रीडच्या 200 पेक्षा जास्त कुत्र्यांनी सहभाग घेतला होता. पण सर्वांच्या नजरा तिबेटियन मस्टीफ ब्रीडच्या डॉगवर खिळल्या होत्या.
– या ब्रीडची इंटरनॅशनल मार्केटमध्ये 15 ते 30 कोटी किंमत आहे. 30 कोटींमध्ये एखादे लहानसे विमान खरेदी केले जाऊ शकते. या शोमध्ये आलेला हा कोट्यावधींचा कुत्रा तिबेटियन मस्टीफ दिल्ली येथून आला होता.
– चीनमध्ये लिलाव करुन हा कुत्रा खरेदी केला जातो. या तिबेटियन मस्टीफची किंमत जेवढी महाग आहे, तेवढेच महाग याला सांभाळणे आहे. याला 24 तास एसीमध्ये ठेवावे लागते. यासोबतच 15 दिवसांतून स्पा करुन आणावे लागते.
– याचे जेवण जर्मनीमधून आणि बदाम ईरानमधून मागवले जातात. याची साइज 32 इंच असते आणि वजन जवळपास 70-80 किलो असते.
जगातील चार प्रजाती, सर्वात  महागडे आणि खतरनाक कुत्रे

१. कार्पेथियन वूल्फ

त्यांनी ४८ वर्किंग लाईन जर्मन शेफर्डसचे चार कार्पेथियन वूल्फ बरोबर ब्रीडिंग केले. त्यांना ह्या प्रयोगातून एक अशी प्रजाती हवी होती जिच्यात जर्मन शेफर्डचा स्वभाव असेल. पॅकची मानसिकता व प्रशिक्षण घेण्याची बुद्धी असेल. शिवाय कार्पेथियन वूल्फची शक्ती, शरीराची मजबूत रचना आणि स्टॅमिना हे गुण असतील.
ह्या प्रजातीची किंमत दीड हजार डॉलर्स इतकी आहे.
२ .सालुकी 

हा इजिप्तचा रॉयल श्वान आहे. ही प्रजाती प्राचीन काळापासून माणसाची सोबत करत आली आहे. प्राचीन काळी इजिप्तचा शासनकर्ता फॅरो कडे सुद्धा सालुकी श्वान होता. सालुकी ही प्रजाती फर्टाईल क्रीसेंट पासून तयार झाली आहे.
सालुकी श्वान साईटहाउंड म्हणून ओळखले जातात. ह्या श्वानाची छाती खोल असते व पाय लांब असतात. त्यांना स्वतंत्र राहायला आवडते. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पेशन्स ठेवावा लागतो.
परंतु हे आपल्या मालकांवर खूप प्रेम करतात, मालकांशी अतिशय हळुवारपणे वागतात. ह्या प्रजातीतील नराचे वजन ६० पौंड असते व लांबी २८ इंचांपर्यंत असते. ह्यांची किंमत अडीच हजार डॉलर्सपर्यंत असू शकते.
३ .रॉटविलर 

ही पाळीव श्वानांची प्रजाती आहे. ह्यांचा आकार मध्यम ते मोठा असतो. ह्या श्वानांना जर्मनी मध्ये Rottweiler Metzgerhund म्हणत असत म्हणजेच रॉटविलच्या बचर्स म्हणजेच खाटीक लोकांचे श्वान.
आता मांस वाहून नेण्याचे काम दुसऱ्या वाहनांनी होत असल्याने ह्या श्वानांचा उपयोग तपास करण्यासाठी तसेच बचावकार्यात होतो. तसेच दृष्टिहीन लोकांसाठी हे श्वान एका गाईडचे काम करतात. ह्या प्रजातीची किंमत चार हजार डॉलर्सपर्यंत आहे.
४. फॅरो हाउंड
 

 हा माल्टा ह्या देशाचा राष्ट्रीय हाउंड आहे. ह्या श्वानाचे माल्टीज भाषेतले लोकल नाव Kelb tal-Fenek आहे. Kelb tal-Fenek म्हणजे रॅबिट डॉग होय. पारंपारिकरित्या बघायचे झाल्यास ह्या श्वानांचा उपयोग सशांची शिकार करण्यासाठी केला जातो.
 फॅरो हाउंड दिसायला अगदी रुबाबदार व रॉयल असतो. ह्याची बुद्धी तीक्ष्ण असते व ह्यांचे शरीर सशक्त व दणकट असते. ह्या प्रजातींपैकी काहींची किंमत साडेसहा हजार डॉलर्स आहे.