चिमुकल्यांची काळजी घेताना ‘या’ 4 चुका नक्की टाळा ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेव्हा एखादं कपल पहिल्यांदा आई वडिल बनतं तेव्हा बाळाची काळजी घेण्याबद्दल त्यांना अनेक गोष्टी माहित नसतात. त्याच्याकडून अनेक चुका होण्याची शक्यता असते. त्या चुका कोणत्या आहेत ज्या टाळणं गरजेचं आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

1) स्वत:ची काळजी न घेणं -अनेक पालक बाळाची काळजी घेण्याच्या नादात स्वत:ची काळजी घेत नाहीत. परंतु तुमची काळजी घेतली नाही तरी त्याचा बाळाच्याही आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून स्वत:चीही काळजी घ्या.

2) जास्त प्रोटेक्टीव होणं – मुलांची योग्य पद्धतीनं काळजी घेणं महत्त्वाचं आहेच. परंतु अनेकदा काही पालक मुलांना इतरांकडे देत नाहीत. त्यामुळं जास्त प्रोटेक्टीव होऊ नका. मुलांची इतरांसोबतही ओळख असू द्या.

3) लगेच घाबरणं – मुलाला काही त्रास झाला जसे की, उलटी किंवा खोकला तर काही पालक प्रचंड घाबरतात. घाबरण्याची गरज नाही. असं काही झालं तर लगेच डॉक्टरांकडे जा आणि योग्य सल्ला घ्या.

4) प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टीपणं – अनेक पालक मुलांचे काही क्षण कॅमेऱ्यात टीपण्याच्या नादात सारखेच फोटो काढण्यात व्यस्त असतात. फोटो काढा परंतु मुलांसोबत ते क्षण आनंदाने जगायचे आहेत हेही लक्षात असू द्या.

4) कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका – मुलांची काळजी घेताना पालकांच्या आजूबाजूचे लोक त्यांना अनेक सल्ले देत असतात. परंतु लगेच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. बाळासंबंधित काही असेल तर घरातल्या मोठ्या मंडळींचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.