देवानं दिलेल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग ‘असा’ करावा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

श्रोत्रं श्रुतेनैव न कुंडलेन। दानेंन पार्णिन तु कंकणेन ।। विभाति काय:करुणापराणां । परोकारैर्न तु चन्दनेन।।

दिले इंद्रिय हात पाय कान । डोळे मुख बोलाया वचन ।। जेणें तू जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ।।

भगवंताने आपल्याला दिलेल्या अनमोल शरीराच्या प्रत्येक अवयवाचे कार्य आपण कधीच समजून घेतले नाही. भगवंताने आपल्या अवयवाचे विशेष कार्य आपल्यावर सोपविले आहे. भगवंताचं गुणगान ऐकणं, हरिभजन, हरिकीर्तन, ज्ञानाच्या चांगल्या गोष्टी ऐकणे हे कानाचे काम आहे. केवळ कानात सुवर्णाची कर्ण फुले घालून कानाची शोभा वाढवून चालत नाही. तसेच हाताची शोभा सुद्धा गरजवंताना दानधर्म केल्याने वाढते, नुसत्या बांगड्यांनी वाढवता येत नाही. सज्जन व्यक्तीचे शरीर हे चंदनाच्या लेपाने सुगंधित होत नाही. तर त्यासाठी हे शरीर इतरांवर परोपकार करण्यासाठी चंदनासारखं झीजवाव लागतं. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग हा सत्कर्म, सत्कार्य करण्यासाठीच करावा. तरच आपलं जगणं समाधानाचं आणि आनंदाचं राहील.

प्रत्येकाने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे जीवनात काही चांगलं करावंसं वाटेल त्यावेळी ते लगेच करा पण जेव्हा कोणाचं वाईट करण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली. तसी इच्छा मनात देखील येऊ नये. परंतु झालीच तर तेंव्हा थांबून आधी हजार वेळा विचार करा. हेच आपल्या भल्यासाठी उपयुक्त ठरेल.

(शब्दांकन : संतचरणरज- शिरोळे महाराज, खारघर, नवी मुंबई)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like