कोरोनामध्ये प्रत्येकाने जबाबदारीने काम केले : कॉ. डॉ. उदय भट

पुणे : प्रतिनिधी – सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कोरोनाच्या कालावधी हॉस्पिटल, पत्रकार, पोलीस, विद्युत विभाग, दूरसंचार निगम, स्वयंसेवी संस्थांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन काम केले. त्यामुळे आपण कोरोनाला आटोक्यात आणू शकलो. भविष्यातही प्रत्येकाची अशीच मदत होईल, असे मत पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) कॉ. डॉ. उदय भट ( Dr. Uday Bhat)यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचे औचित्य साधत कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्ग, पोलीस कर्मचारी, पत्रकार यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बी.ए.एस.संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष भरत ठोंबरे, हवामान संशोधन संस्थानचे डॉ. मिलिंद मुजुमदार यांचा संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी पुणे मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट, रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या अध्यक्षा मानसी खुजरेकर, मनपा कामगार युनियनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत गमर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप, दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार अरुण कुलकर्णी, सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ राजेश नायर, पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, पालिका कामगार युनियनचे जॉईंट सेक्रेटरी मधुकर नरसिंगे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.