लोकसंख्येच्या आधारावर सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे ; लोकसभेत खासदारांची मागणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चे दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी लोकसंख्येच्या आधारावर सर्वांना आरक्षण देण्यात यावे असे म्हणत समाजवादी पार्टीच्या वतीने या विधेयकाला विरोध आहे असे धर्मेद्र यादव म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात हे आरक्षण लागू करण्यास अडचण निर्माण होईल असे मत खासदार आनंद अडसूळ यांनी मांडले आहे. सरकारी नोकरी आणि खाजगी नोकऱ्यांत हि आरक्षण देण्यात यावे हि मागणी अनेक पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे. याच चर्चेत  समाजवादीचे नेते धर्मेंद्र यादव यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वानाच आरक्षण देण्यात यावे असे मत मांडले आहे.

आजवरच्या सरकारांनी गरीब सवर्णांना आरक्षण देण्याचे प्रयत्नच केले नाहीत असे म्हणत अरुण जेटली यांनी देशातील नव्या आरक्षण मंजुरीसाठी देशातील ५० टक्के राज्यांची मंजुरी घेण्याची कसलीही आवश्यकता नाही असे जेटली यांनी म्हणले आहे.  सबका साथ सबका विकास हे आमचे लक्ष आहे त्याच विचारला न्याय देण्यासाठी आम्हाला हे आरक्षण अस्तित्वात आणायचे आहे असे हि अरुण जेटली म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे काँग्रेसवर हि जेटलींनी या मुद्द्याच्या निमित्ताने तोंड सुख घेतले आहे.

मागील काही वर्षात आज विरोधी बाकावर बसलेल्या लोकांनी गरिबांना आरक्षण देण्याचे म्हणले होते त्यांनी या आश्वासनाकडे सोयीस्कर रित्या पाठ फिरवली होती असे अरुण जेटली म्हणाले आहेत. सरकारने आरक्षणाच्या निमित्ताने जमले बाजी सुरु केली आहे हि जुमलेबाजी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे ठेवून केली जात आहे असे मत काँग्रेसचे खासदार के. व्ही. थॉमस म्हणाले आहेत.