‘अजीनोमोटो’ खात असाल तर वेळीच व्हा सावध ! होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

पोलीसनामा ऑनलाइन –

काय आहे अजीनोमोटो ?
अजीनोमोटो हे एक प्रकारचं केमिकल आहे. याला MSG असंही म्हटलं जातं. याचा अर्थ आहे Mono Sodium Glumate. हा प्रोटीनचा हिस्सा आहे. याला अमिनो ॲसिड्सही म्हटलं जातं. अजीनोमोटो याला सर्वात जास्त बनवतं. त्यामुळं याला याच नावानं ओळखलं जातं.

कुठे केला जातो अजीनोमोटोचा उपयोग ?
– खास करून चायजीन जेवणात अजीनोमोटोचा वापर केला जातो. यामुळं चव वाढवली जाते.
– 1908 मध्ये हा एक ब्रँडच्या रुपात व्यावसायिक स्वरूपात आला होता. जगभरात स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
– चायनीज फूड जसं की, नूडल्स, सूप आदीमध्ये याचा वापर केला जातो.
– बर्गर, पिज्जा, मॅगी मसाला यांच्यातही याचा वापर टेस्ट वाढवण्याच्या हेतूनं केला जातो.

अजीनोमोटोच्या सेवनानं काय नुकसान होऊ शकतं ?

1) वांझपणा – गर्भवती महिलांनी याचं सेवन करणं टाळायला हवं. कारण याच्या सेवनाचा थेट परिणाम न्युरोंसवर पडतो. यामुळं शरीरातील सोडियमचं प्रमाणही वाढतं. यामुळं ब्लड प्रेशर वाढण्याचा धोकाही असतो. महिलांच्या वांझपणालाही हे कारणीभूत ठरू शकतं.

2) मायग्रेन – अर्ध डोक दुखणं म्हणजे मायग्रेन. अजीनोमोटोचं जास्त सेवन केल्यानं हा त्रास होऊ शकतो. आजही तरूण पिढीपैकी अनेकांना ही समस्या आहे. त्यामुळं अजीनोमोटो युक्त खाद्य पदार्थ खाणं टाळायला हवं.

3) लठ्ठपणा – आजकाल जंकफूड जास्त प्रमाणात खाल्लं जातं. यात अजीनोमोटो जास्त प्रमाणात असतं. यामुळं शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं. याच्या सेवनामुळं वारंवार भूक लागते. यामुळं माणूस वारंवार काही ना काही खात असतो. यामुळं लठ्ठपणा वाढतो.

4) अनिद्रा – अजीनोमोटो एक न्यूरोट्रान्समीटर आहे जे मेंदूतील पेशी किंवा न्यूरॉंसला उत्तेजित करतं. यामुळं रात्रभर झोप येत नाही. याचा परिणाम असा होतो की, दिवसा काम करताना झोप लागते. याशिवाय झोप न झाल्यानं वीकनेस जाणवतो. यामुळं श्वासासंबंधित रोग होण्याचाही धोका असतो.

5) छातीत दुखणं – याच्या सेवनानं अचानक छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागतो. यामुळं धडधड देखील वाढते. हृदयाच्या स्नायूंमध्ये तणावदेखील जाणवतो.

6) मुलांसाठीही हानिकारक आहे अजीनोमोटो – मुलांनाही याच्या सेवनापासून दूर ठेवायला हवं. जर एखाद्यानं याचं सेवन केलं आणि त्याला वर दिलेली लक्षणं जर जाणवली नाहीत याचं सेवन सुरक्षितही असू शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.