कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाने संघर्ष केला : डॉ. नलिनी चौधरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना महामारीमध्ये मागिल वर्षभर प्रत्येकाने संघर्ष केला. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रत्येकाने कर्तव्य बजावत प्रशासनाला मोठे सहकार्य केले, त्यामुळेच आपण आजचा ऐतिहासिक प्रजासत्ताकदिन साजरा करीत आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे, असे मत पुणे मनपाच्या शाळा क्र.81च्या मुख्याध्यापिका डॉ. नलिनी चौधरी यांनी व्यक्त केले.
हडपसर (साडेसतरानळी) येथील साधुनानावस्ती येथील मनपा शाळा क्र.81 मध्ये प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी सुनील तुपे, रवींद्र तुपे, शिवाजी डोंबे, कविता शिंदे, गणेश भोसले, ज्योती ढोणे, पोपट शेळके, सुनीता काळे, शिल्पा मोरे, नीता कणसे, राधिका गोरे, रुकैय्या वांगी, शिवाजी तुपे, दत्तात्रय घुले, श्रीकांत औताडे, सतीश गायकवाड, उज्ज्वला सणस, चंदना मोरे, सुनंदा शिर्के उपस्थित होते. यावेळी बेटी बचाव अभियानचे जनक डॉ. गणेश राख, डॉ. अभिजित दनाईत, अ‍ॅड. शंतनू तुपे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना कालावधीमध्ये स्वच्छतादूत, शिक्षकांचा विशेष गौरव करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महानोर यांनी मनोगत व्यक्त केले.