दहावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाला प्रवेश : अहिरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य शिक्षण मंडळाकडून बुधवारी दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या शाखाना प्रवेश मिळणार असून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे मुंबई शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83c01de2-ac10-11e8-9af5-d38fa8358f44′]

अकरावी प्रवेशाच्या आत्तापर्यंतच्या प्रवेशफेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना सुरळीतपणे प्रवेश देण्यात आले आहेत. ज्या विद्याथ्र्यांना प्रवेश मिळाले नाहीत त्यांच्यासाठी ३१ तारखेला पुन्हा एक प्रवेशफेरी आयोजित केली आहे.

शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे म्हणाले, बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात राज्यभरातून २८ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेला ३३ हजार ६४६ विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३ हजार ३९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४ हजार ७४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. त्यासाठी खास प्रवेशफेरी आयोजित केली जाणार आहे.

दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात १ लाख २१ हजार ५९ विद्यार्थ्यांपैकी केवळ २८ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकुण निकाल २३.६६ टक्के लागला आहे. मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अद्यापही ७६ हजार जागा रिक्त आहेत.