Adult Asia Expo : ‘इथं’ विकल्या जातात मागणीनुसार स्वप्नातील ‘सेक्स’ Dolls ! जाणून घ्या

सध्याच्या काळात जागतिक स्तरावर सेक्स टॉयचं मार्केट वाढताना दिसत आहे. अनेकांना सेक्स डॉलवर प्रेम झालं आहे तर अनेकांनी तिच्यासोबत घर सुरू केलं आहे. अनेकांचा म्हातारपणाचा तर काहींच्या एकांताचा आधार सेक्स डॉल आहे असं समोर आलं आहे. काही लोक तर अगदी पार्टनरसारखंच तिच्यावर प्रेम करतात. या इंडस्ट्रीत सेक्स टॉईजचं एग्जिबिशन भरवलं जातं. यात लेटेस्ट सेक्स टॉईजसोबत सेक्स डॉलचीही मोठी रेंज पहायला मिळते.

हँगकाँगमध्ये भरवण्यात आलेल्या Asia Adult Expo मध्ये Future of Sex ला दाखवलं जात आहे. असं मानलं जात आहे की, येणाऱ्या काळात वयस्कांना संतुष्टी देण्यासाठी सेक्स डॉल मोठी भूमिका पार पाडणार आहे. वयस्कांसाठी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला हजारोंच्या संख्येत गर्दी झाली आहे. या बद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊयात.

जे करतात सेक्स डॉल फँटसी

Asia Adult Expo अशा लोकांसाठी आहे ज्यांना सिलिकॉन सेक्स डॉलमध्ये रस आहे. इथं विविध आकार, रंग आणि साईजच्या सेक्स डॉल मिळतात. अनेकांना त्यांना हवी तशी सेक्स डॉल मिळते.

लोकांमध्ये नवीन आकर्षण

गेल्या अनेक वर्षांपासून हाँग काँगमध्ये अशाच प्रकारचं प्रदर्शन आयोजित केलं जात आहे. परंतु यावेळच्या प्रदर्शनात मात्र Full Sized Elf Dolls ची रेंज समाविष्ट करण्यात आली आहे. Asia Adult Expo ला जगातील सर्वात मोठं Sexhibition म्हटलं जातं. त्यामुळं हे सर्वच लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

2000 हून अधिक सेक्स डॉल एग्जिबिट केल्या जातात.

या ट्रेड फेयरमध्ये 2000 हून अधिक सेक्स डॉल मॉडेल सारख्या सजलेल्या असतात. या सेक्स डॉलची किंमत 6 हजार डॉलरच्या आसपास असते. गेल्या काही काळात सेक्स डॉल आपल्या रिअॅलिस्टीक फीचर्समुळे खूप पॉप्युलर झाल्या आहेत. यांची मागणीही वाढलेली दिसत आहे.

व्हर्चुअल गेम्सचा हिस्सा बनू शकतात

या प्रदर्शनात Virtual Reality Sex Games चा देखील समावेश करण्यात आला आहे. या गेम्समध्ये रस असणाऱ्या लोकांना हेटसेट घालून नकली सेक्स सिनारिओ दाखवले जातात. एवढंच नाही तर या गेम्समध्ये सहभागी युजर्सला व्हर्चुअल पार्टनरसाठी लिंगरीज निवडण्याची देखील सोय असते.

BDSM साठी वेगळे स्टॉल

BDSM मध्ये रस असणाऱ्या लोकांसाठी वेगळे स्टॉल आहेत. यात अनेक प्रकारचे Whips Masks आणि Clamps ठेवण्यात आले आहेत. इतकंच नाही तर गरजेनुसार हे मॉडीफाईड करता येतं.