सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही हे निश्चित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंचावर दिसले. त्यावेळी त्यांनी दोन्ही पक्षामधील उरलेसुरले वादही मिटवले. यावेळी शिवसेनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अथिती म्हणून आले होते. त्यावरून आजच्या सामनाच्या संपादकीयमध्ये शिवसेनेन पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्रीपदावरून युतीत किलमिष तयार झाले होते. पण शिवसेनेनं यावर फुकंर घातली.

यावेळी शिवसेनेनं भाजपवर विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले ‘‘सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल!’’ त्यामुळे आता स्पष्टच सांगायचे तर युतीच्या विरोधकांनी पाण्यात घातलेले देव बाहेर काढावेत हेच बरे! एकतर ही युती आता तुटणार नाही, मतभेदांच्या खडकावर आपटून फुटणार नाही, असा विश्वास सामना संपादकीयमधून व्यक्त करण्यात आला आहे.

53 व्या वर्धापन दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांचे त्याच दिलदारीने स्वागत केले गेले. ‘‘शिवसैनिकांकडून ऊर्जा घेण्यासाठी मी येथे आलो आहे,’’ असे मुख्यमंत्री सहज बोलून गेले, पण समोरची उसळती ऊर्जा पाहून तेही त्या जल्लोषाचा एक भाग बनले. शिवसेनेच्या ‘शुद्ध’ व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. कदाचित बुबुळेही खोबणीतून बाहेर पडली असतील. महाराष्ट्राचे भवितव्य आणि नशिबाची गाठ युतीबरोबर बांधली गेली आहे, असं संपादकिय मध्ये म्हटलं आहे.

शिवसेनेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री कसे? यावर अनेकांना जे खाजवायचे ते खाजवत बसू द्या. डोकी नसल्याने ते खाजवण्याचा प्रश्नच येत नाही. अतिथींना बोलवून त्यांचे विचार ऐकणे ही परंपरा शिवसेनेची आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मुख्यमंत्री बिनधास्तपणे म्हणाले, आमच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद नाहीत. सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल. हे मुख्यमंत्र्यांचे विधान लाखमोलाचे आहे. युतीत मुख्यमंत्रीपदाचे काय? यावर चघळत बसणाऱ्या मीडियाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे उत्तर आहे. जे ठरले तेच होईल हा युतीतील समन्वयाचा मंत्र आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

शाकाहारी व्यक्तींनी “प्रोटीन आणि व्हिटॅमिन” वाढवण्यासाठी खा हे पदार्थ 

अहो आश्चर्यम ! ८४ वर्षाच्या आजी करतात ‘योगा’

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”