एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये ‘जुंपली’, ‘नाथाभाऊ’ म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपासून भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असल्याचे दिसत आहे. आज भाजपची उत्तर महाराष्ट्र स्तरावरील 5 जिल्ह्यांची बैठक दुपारी पार पडली, यात खडसेंनी अचानक उपस्थिती लावली. एवढेच नाही तर या बैठकीत खासदार रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे दोघीही उपस्थित होत्या. परंतू बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देखील खडसेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. आपल्याकडे सर्व पुरावे नावानिशी आहेत आणि ते प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने सर्वांसमोर मांडणार असल्याचे देखील खडसेंनी सांगितले.

खडसेंनी हे ही स्पष्ट केली की गिरीश महाजन यांनी पुरावे मगितल्याच्या वृत्तावर आलेल्या सोशल मीडियावरील कंमेंटच्या झेरॉक्स काढल्या असून, त्या प्रदेशाध्यक्षांकडे देणार आहे.

विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचे ते सांगत आहेत. त्यांनी ती नावे गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

कोणीही कोणाला पाडत नसतं. त्यांना अपयश आलं, याचं आम्हालाही वाईट वाटतं. मुक्ताईनंतर मतदारसंघातून एकनाथ खडसे यापूर्वीही अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या विरोधात 1200 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणूकीत मोदी लाट असताना देखील फक्त 8500 मतांनी निवडून आले होते. यावेळी खडसेंनी तिकिट नाकारल्याने फरक पडल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Visit : Policenama.com