भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक

लंडन : वृत्तसंस्था – भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा आरोप या सायबर एक्सपर्ट्सने केला आहे.

सय्यद सुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव असून त्याने लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे गौप्यस्फोट केले. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये त्याने EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला सुरुवातीपासून उपस्थित होते.

भाजपाच नव्हे तर आम आदमी पक्षानेही EVM हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, 2015 साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला, असा गौप्यस्फोट या हॅकरने केला आहे.